( गणपतीपुळे / वैभव पवार )
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड, वरवडे, गणपतीपुळे, भंडारपुळे मार्गावर मोठ्या प्रमाणात खडीचे साम्राज्य पसरले आहे. हा मुख्य मार्ग वाहतुकआणि रहदारीसाठी योग्य प्रकारचा असताना आज (रविवार) अचानकपणे सकाळपासून या मार्गावर मोठ्या प्रमाणात खडीचे साम्राज्य पसरले आहे. तसेच बारीक रेतीचे साम्राज्य ही दिसून येत आहे. त्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला आहे तसेच दुचाकी वाहनांसाठी हा मार्ग मोठ्या प्रमाणात धोकादायक बनला आहे. तसेच दुचाकी अपघातांचे प्रमाणही वाढू शकतो, असा धोका आहे.
खडीमुळे धुरळ्याचे प्रमाण वाढले
दरम्यान, मालगुंड, गणपतीपुळे, वरवडे ,भंडारपळे या मुख्य मार्गावर रविवारी सकाळपासून पूर्णपणे खडी व बारीक रेतीचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात पसरल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणात धुरळ्याचे प्रमाण वाढल्याने ये जा करणाऱ्या वाहन चालकांबरोबरच पादचाऱ्यांनाही मोठ्या प्रमाणात धुळीचा सामना करावा लागला. या कारणाने मोठ्या प्रमाणात तीव्र संताप व नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. एकूणच मालगुंड, गणपतीपुळे, वरवडे व भंडारपळे या चारही मार्गांवर मोठ्या प्रमाणात खडीचे साम्राज्य पसरल्याने सर्वच लहान मोठया वाहन चालकानी आपली वाहने हाकावित आणि अपघातांचा धोका टाळावा असे आवाहन स्थानिक ग्रामस्थांमधून करण्यात आले आहे.