(मुंबई)
रेल्वे तिकीट आरक्षणाच्या नियमांमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. नवीन नियमांनुसार आता 60 दिवस आधी तिकीट रिझर्व्ह करता येणार आहे. पूर्वी हा कालावधी 120 दिवसांचा होता. नवीन नियम 1 नोव्हेंबर 2024 पासून लागू होणार आहे.
रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, 1 नोव्हेंबर 2024 पासून तिकीट रिझर्व्ह करण्यासाठी 60 दिवस आगोदर (प्रवासाचा दिवस सोडून) जागा आरक्षित करावी लागणार आहे. जुना 120 दिवसांचा नियम 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत कायम राहणार आहे. त्यामध्ये कोणताही बदल होणार नाही. त्याचबरोबर 60 दिवसांच्या कालवधीत रिझर्व्ह केलेली तिकीट रद्द करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, परदेशी पर्यटकांच्या नियमामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. म्हणजेच त्यांचा 365 दिवसांचा कालावधी कायम असणार आहे.
रेल्वेने या अधिसूचनेत म्हटले आहे की 1 नोव्हेंबर 2024 पासून, ट्रेनमधील आगाऊ आरक्षणाची सध्याची वेळ मर्यादा 120 दिवसांवरून 60 दिवसांपर्यंत कमी केली जाईल (प्रवासाची तारीख वगळता). तथापि, 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत 120 दिवसांच्या ARP अंतर्गत केलेले सर्व बुकिंग कायम राहतील. हा नवा नियम नोव्हेंबरपासून केलेल्या बुकिंगवर लागू होणार आहे.
ताजसारख्या ट्रेनला नियम लागू होत नाहीत
ताज एक्स्प्रेस, गोमती एक्स्प्रेस अशा काही विशेष गाड्यांवर हा नियम लागू होणार नाही. या गाड्यांच्या बुकिंग नियमांमध्ये कोणताही बदल होणार नाही. त्याचबरोबर विदेशी पर्यटकांसाठी 365 दिवसांची मुदतही बदलली जाणार नाही, म्हणजे परदेशी पर्यटकांच्या आगाऊ बुकिंगवर कोणताही परिणाम होणार नाही.
रेल्वेने सांगितले की, केवळ 13 टक्के लोकच 120 दिवस अगोदर ट्रेनचे बुकिंग करतात. बहुतेक लोक ४५ दिवसांच्या आत तिकीट आधीच बुक करतात. याशिवाय आतापर्यंत आगाऊ तिकीट बुक केल्यामुळे रद्द करणे आणि पैसे परत करण्याची समस्या आहे. रेल्वेच्या या निर्णयामुळे तिकिटांच्या काळाबाजाराला आळा बसणार असल्याचे रेल्वेचे म्हणणे आहे.
Post Views: 3,514