कोलकाता येथील महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचाराच्या तसेच बदलापूर शहरामध्ये अल्पवयीन चिमुकल्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराविरोधात येथील माहेर संस्थेने संस्थापिका संचालिका सि. लुसी कुरियन यांच्या मार्गदर्शनाखाली पीडितांना न्याय मिळावा, यासाठी तसेच यापुढे महिलांवरील अत्याचाराच्या प्रकारांना आळा बसावा, यासाठी कॅन्डल मार्चचे आयोजन केले होते.
यावेळी संस्थेतील प्रवेशितांनी ‘वाँट जस्टीस, अत्याचार थांबवा’ असे फलक व जळत्या मेणबत्त्या हातात घेऊन समर्थ नगर हातखंबा येथे कॅन्डल मार्च करून निषेध व्यक्त केला. यावेळी अत्याचारात बळी पडलेल्या महिलांसाठी विशेष प्रार्थना करण्यात आली. यावेळी माहेर संस्था रत्नागिरीचे प्रकल्प प्रमुख सुनील कांबळे, कर्मचारी शीतल हिवराळे, ऋतिका मरसकोल्हे, विजया कांबळे, माधुरी पांचाळ, आशिष मुळे व संस्थेतील प्रवेशित मुले-मुली, महिला उपस्थित होत्या.
Welcome...
https://ratnagiri24news.com
'रत्नागिरी 24 न्यूज' वेबपोर्टल रत्नागिरीकरांच आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. कोणतंही वैचारीक, आर्थिक वा राजकीय जोखड नसलेला हा सर्वसामान्यांसाठी स्वतंत्र पत्रकारितेचा एक डिजिटल मिडीया प्लॅटफॉर्म आहे. आपल्या भागातील समस्या, घटना, बातम्या आमच्या 9527509806 या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवा.
- टीम 'रत्नागिरी 24 न्यूज'
This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy. I Agree
महानगरांसह जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडींसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा. बातम्यांसोबत संग्राह्य माहितीचा खजानाही !