(रत्नागिरी)
माहेर संस्था गेल्या २७ वर्षांपासून महिलासाठी काम करत आहे. त्यांचबरोबर मुले, मुली, मानसिक आजारी पुरुष व आजी आजोबा यांच्यासाठी काम करत आहे. माहेर संस्था रत्नागिरी येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यात कार्यक्रमाचे प्रमुख अतिथि म्हणुन श्रीम. मिरा महामुनी उपनिरीक्षक ग्रामीण पोलीस स्टेशन रत्नागिरी व त्यांचे सहकारी उपस्थित होते. माहेर संस्थेच्या संस्थपिका सि. लूसी कुरियन अध्यक्षा हिराबेगम मुल्ला यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या व महिला दिनानिमित्त एकुण १५ कामगार कुटुंबाला आमंत्रित करुण कपडे व धान्य वाटप करण्यात आले.
मिरा महामुनी यांनी कार्यक्रमांचे कौतुक करुन त्या म्हणाल्या कि, माहेर अनाथानसाठी खरच हक्काचे घर आहे. ज्याप्रमाणे माहेरचे काम आम्ही पाहत आहोत त्याप्रमाणे माहेर सर्वांचा गोण्यागोविंदाने सांभाळ करत आहेत. दैनंदिन व नित्यनियमाप्रमाणे पेशंटला हॉस्पिटलला घेऊन जाणे व गोळ्या घेऊन येणे व इतर खुपचं चांगली सेवा माहेर करत आहेत. पेशंटचां फॉलोअप देखील घेत असतात असे म्हणत महामुनी यांनी कामाचे खूप कौतुक केले.
ज्याप्रमाणे घरात स्त्री असायला पाहिजे त्याचप्रमाणे एक भाऊ देखील विशाल सरांसारखा असायला पाहिजे. माहेर हे खरचं माहेर च्या नावाप्रमाणे आहे. त्याचप्रमाणे कार्यक्रमात उपस्थित कामगार महिलांना गिफ्ट देण्यात आले व त्यांचा देखील सन्मान करण्यात आला. तसेच केक कापुन महिला दिन साजरा करण्यात आला व कार्यक्रमाच्या शेवटी गोड जेवणाचा आस्वाद घेण्यात आला व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती शितल हिवराळे यांनी केले. आभार प्रदर्शन श्री. विशाल सैंदाणे प्रकल्प प्रमुख यांनी केले.