(राजापूर)
राजापूरात महामुंबई नामक बँकेने चार जणांना साडे आठ लाखाचा दंडा घातल्याची तक्रार राजापूर पोलिसात झालेली असताना आता आणखीन एका तक्रारदाराने या बँकेकडून ९ लाख १० हजार रूपयांची फसवणूक झाल्याची तक्रार राजापूर पोलीस ठाण्यात दिली आहे. तशी माहिती पोलीसांनी दिली आहे.
मनेश सखाराम कांबळे, रा. सोलगाव, ता. राजापूर असे या तक्रारदाराचे नाव असून मोठया परताव्याचे आमिष दाखवून आपली फसवणूक केल्याप्रकरणी महामुंबई निधी अर्बन बँक शाखा राजापूरचे मंगेश महादेव जाधव सागर रिकामे, मयुर पाटील, सर्व रा. मुंबई यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी मंगेश महादेव जाधव, सागर रिकामे, मयुर पाटील, सर्व रा. मुंबई यांच्या विरोधात राजापूर पोलीसांनी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे ३१६(२), ३१८(४), ३(५) सह महा. ठेवीसंस्था वित्तीय आस्थापणा मधील हितसंबंध रक्षण अधिनियम १९९९ चे कलम ८,४ प्रमाणे गुन्हा दाखल केला.
या बँकेने अनेकांना चुना लावल्याचे प्रकार समोर आले आहे. पोलीस स्थानकात अनेक तक्रारी दाखल आहेत. या बँकेने अनेकांचे लाखो रुपये घेऊन जिल्ह्यातून गाशा गुंडाळल्याचे वृत्त आहे