( रत्नागिरी / प्रतिनिधी )
रत्नागिरीतील चांदसुर्या येथे 6.50 वाजता वॅगनार गाडीला अपघात झाला. ही वॅगनार रत्नागिरी हून मुंबईच्या दिशेने जात होती. गाडीला ओव्हरटेक करताना वॅगनार बाजूच्या गटार कोसळली. सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत झाली. मात्र गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
सविस्तर वृत्त असे की, रत्नागिरी हून मुंबईच्या दिशेने वॅगनार चालली होती. या गाडीत 5-6 प्रवासी होते. वॅगनार चांदसुर्या येथील बाळ सत्यधारी महाराज मठासमोर आली असता समोरील ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न वॅगनार चालक करत होता. तेवढ्यात समोरून एक गाडी आल्याने चालक गोंधळला. त्यातच खड्डे असल्यामुळे त्याला गाडीवर नियंत्रण मिळवता आले नाही. गाडी थेट उजव्या बाजूच्या गटारात जाऊन आदळली. गाडीला अपघात झाल्याचे कळताच परिसरातील नागरिकांनी धाव घेतली. वाहनांची गर्दी झाली आहे. काहींनी गाडीतील प्रवाशांना बाहेर काढले. सारे प्रवासी सुखरूप असून किरकोळ जखमा झाल्या आहेत. मात्र गाडीचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले आहे.