(चिपळूण)
एजाज इब्जी हे एक उत्तम मार्गदर्शक, सामाजिक बांधिलकी जपणारे शिक्षक असून विद्यार्थ्यांना फक्त आपल्या शाळेपर्यंत नव्हे तर त्यांना पुढील शिक्षणासाठी तसेच वेगवेगळ्या शासकीय लाभासाठी त्यांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी मार्गदर्शन नेहमीच करत असतात.
शैक्षणिक क्षेत्रात त्यांची उल्लेखनीय कामगिरी, मनमिळावूपणा, कार्यकुशलता, निर्भिड, अभ्यासू, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारा समाजसेवक तसेच सामाजिक क्षेत्रातही त्यांचे मोलाचे योगदान आहे. गोरगरिबांना तसेच अशिक्षित लोकांना वेगवेगळे दाखले काढणे, त्यांचे सर्व प्रकारचे फार्म भरुन देणे. ते स्वत: दिव्यांग असूनही लोकांची कामे आनंदाने करतात, म्हणून जिल्ह्यात त्यांचा नावलौकिक आहे.
सर्व समाजातील लोकांमध्ये त्यांना मानाचे तसेच आदराचे स्थान आहे. अशा या कर्तव्यनिष्ठ, कर्तबगार आणि गुणी शिक्षकास सावर्डे लायन्स क्लब यांच्या कडून लायन्स गुणवंत शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी लायन्स क्लब अध्यक्ष सतीश सावर्डेकर, लायन अरविंद भंडारी, श्रीयुत राष्ट्रपाल सावंत, लायन डाॅ. विरेंद्र चिखले, लायन डाॅक्टर निलेश पाटील, लायन व्याघ्रांबर नेहतराव, लायन अजय उपरे, लायन प्रकाश राजेशिर्के, गोविंदराव निकम हायस्कूल चे प्राचार्य वारे सर, इब्जी गुरुजींच्या सौभाग्यवती समाजसेविका रिझवाना इब्जी, नातेवाईक, मित्रपरिवार आदी उपस्थित होते.यावेळी सर्वांनी इब्जी गुरुजींना मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या.