(गावखडी / वार्ताहर)
पावस विभागातील डोर्ले येथे 8 दिवसात अधून मधून बिबट्याचा दर्शन होत असून त्याने पाळीव कुत्रे, मांजर तसेच उनाड कुत्र्यांचा त्याने फडश्या पाडला असून अश्या मस्तवाल बिबट्याचा त्वरीत बंदोबस्त करावा अशी मागणी डोर्लेतील सामाजिक कार्यकर्ते संतोष पोकडे यांनी केली आहे
वरचेवर दिसणारा बिबट्या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्यांना संध्याकाळी 7 वाजल्या पासून ते रात्री 10 वाजे पर्यंत डोर्ले येथील भंडारवाडी येथे दिसत आहे. हा बलदंड बिबट्या अनेकवेळा रात्री रस्त्यात उभा असतो, मागील 2 दिवसा पूर्वी डोर्ले ते घावळ वाडी असा प्रवास करताना ग्रामस्थ वासुदेव जुवळे यांना तो दिसला. तो रस्त्यात ठाण मांडून बसल्याने त्यांची बोबडीच वळली.
अश्यातच त्या बिबट्या ने कुत्र्या मांजरासह जनावरांचा फडशा पाडून आपला मोर्चा घरातील कोंबड्यांवर वळविला आहे. अश्या या बिबट्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याआधी वनविभागाने त्वरीत बंदोबंस्त करावा अशी मागणी संतोष पोकडे यांनी केली आहे.