( संगमेश्वर / प्रतिनिधी )
जगातील कोणती भाषा ही समाजाचा आरसा असते. देशातील विविधतेमध्ये देखील एकात्मता निर्माण करण्याचे काम भाषा करत असते असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले .ते ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमास स्वागत अध्यक्ष शरदचंद्र पवार, संमेलन अध्यक्ष डॉ.तारा भवाळकर ,प्रमुख पाहुणे देवेंद्र फडणवीस, कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक संजय नहार आदी मान्यवर उपस्थित होते.
दिल्ली विज्ञान भावनांमध्ये झालेल्या उद्घाटनाच्या पहिल्या सत्रामध्ये माननीय नरेंद्र मोदी आपल्या भाषणात म्हणाले की ज्ञानोबा तुकाराम यांच्या मराठी आज मी अभिवादन करतो आहे आज संमेलसाठीचा निवडलेला दिवस हा देखील अधिक महत्त्वाचा आहे जागतिक मातृभाषा दिनाच्या निमित्ताने आज हे संमेलन दिल्लीत होते आहे हा एक चांगला दिवस आहे मराठी भाषा ही अमृताहुनी गोड आहे मराठी भाषा शिकण्याचा प्रयत्न मी केला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या निमित्ताने जगण्याची प्रेरणा संघामुळे मिळाली त्यामुळे मराठी भाषा आणि संस्कृतीशी नाते जोडण्याचे सौभाग्य मला मिळाले आहेत. जीवनात भाषा ही अधिक महत्त्वाची भूमिका घेत असते. मराठीला अभिजात भाषा दर्जा देण्याचे सौभाग्य मला मिळाले आहे .जगातील कोणतेही संस्कृतीची वाहक ही भाषा असते. समाज निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये भाषेचे स्थान अत्यंत महत्त्वाचे असते. मराठी की एक महत्त्वाची भाषा आहे. त्यामध्ये शुरता, वीरता समानता , समरसता ,आध्यात्मिकता, भक्ती ,शक्ती ,आणि युक्ती देखील सामावलेली असल्याचा गौरवद्गार त्यांनी काढले. संतांनी भाषा सुलभ केली. समाजाला नवी दिशा देण्याचे काम केले. गीत रामायणाचा प्रभाव अजूनही माणसांचे मनावर कायम आहेत.मराठी भाषेतील विविध साहित्यिकांच्या विचार पेरणीमुळे स्वातंत्र्याच्या आंदोलनातही मराठी योगदान राहिले आहे. नव्या युगाचा विचार मराठी साहित्याने दिला. विज्ञान, तर्क ,आयुर्वेद यासारख्या विविध विषयांमध्ये मराठी भाषेचे विशेष योगदान राहिले आहेत.मराठी सोबतच महाराष्ट्राने हिंदी सिनेमाला सुद्धा उंची देण्याचे काम केले आहे. भारत प्राचीन आहे .त्यात सभ्यता अधिक असणारा हा एक देश आहे .भाषण विविधतेबरोबर एकात्मतेचि विचार पुढे घेऊन जाण्याचे काम भाषेने केले आहे.भाषा भेदभाव करत नाही.भाषेने एकमेकाला समृध्द करण्याचा प्रयत्न केला आहे. भाषेच्या आधारावर भेदभाव करण्याचे पर्यंत झाले पण ते फारसे यशस्वी होऊ शकले नाहीत. पुढील दोन वर्षांमध्ये मराठी साहित्य संमेलना १०० वर्षे पूर्ण होतील. त्याचे अधिक भव्य दिव्य नियोजन करून ही परंपरा पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.
संमेलनाचे अध्यक्ष तारा भवाळकर म्हणाल्या की, आजचे संमेलन हे बोलीभाषांचे संमेलन आहे. महाराष्ट्राचा विठ्ठल संस्कृतीचा प्रतीक आहे .ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत.विठ्ठल हा येथील मराठी माणसासारखाच साधा भोळा आहे .सर्व जाती धर्माचे लोक त्याचे भक्त आहेत. महाराष्ट्राच्या संतांनी मराठी जतन करण्याचे काम केले आहे. भाषा जीवनात असली तरच ती टिकते .ती जैविक आहे. भाषा बोलली गेली तर जीवंत राहाते .केवळ लेखनामुळे आणि पुस्तकामुळे भाषा टिकत नाही. संतांनी मराठी जीवंत ठेवण्याचे काम केले आहे् माझा विठ्ठल सर्वांना समजून घेणार आहे .भाषा ही संस्कृतीचे बलस्थान आहे. भाषा माणसांना जोडणारी आहे. आज मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष एक महिला झालु आहे म्हणून महत्त्वाचे नाहीत तर ती गुणवत्तेच्या आधारे झाली आहेत हे अधिक महत्त्वाचे आहे असे मत व्यक्त केले. याप्रसंगी मराठाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले मनोगत व्यक्त केले.