(रायगड)
वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभा निवडणुकीची गुरुवारी पाचवी यादी प्रसिद्ध करण्यात आली. जाहीर केलेल्या यादीत रायगडमधून कुमुदिनी रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महायुतीकडून सुनील तटकरे महविकास आघाडीकडून अनंत गीते तर आता वंचित बहुजन आघाडीकडून कुमुदिनी चव्हाण या महिला उमेदवार रिंगणात उतरल्या आहेत.
राष्ट्रीय सेवा योजना ते स्वतःची शिक्षण संस्था कोकण विकास प्रबोधिनी हा प्रवास आज कुमुदिनी चव्हाण यांना सावित्री ची लेक या उपाधी पर्यंत घेऊन गेला आहे. कुमुदिनी चव्हाण यांचे शिक्षण बी. पी. एड,. एम. पीएड., एम. फील. व आता आदिवासी जीवनावर पीएचडी सुरु आहे. शेतकरी गोरगरीब, आदिवासी, विटभट्टी कामगार, भटक्या समाजाची मुलं, यांच्या करिता शाळा काढण्याचा संकल्प केला. आणि त्या करिता त्यांनी कोकणातील महाड तालुक्यातील चोचिंदे गावाची निवड केली. शिक्षण संस्था उभारून मॉडर्न इंग्लिश स्कूल नावाने इंग्रजी माध्यम शाळा सुरु केले. कुमुदिनी चव्हाण यांनी 17 वर्षापूर्वी सुरु केलेल्या शाळेची ओळख आता देशातील सर्वात कमी फी घेऊन इंग्रजीचे दर्जेदार शिक्षण देणारी शाळा अशी झाली आहे. सेवा भावी तत्वावर शाळा चालवीणाऱ्या कुमुदिनी चव्हाण यांना मजुर, आदिवासी, शेतकरी यांच्या मुलांना इंग्रजी बोलताना पाहून खूप आनंद होतो, हीच माझी खरी फी आहे असं त्या बोलतांना म्हणतात.
त्यांच्या शाळेत अनेक विद्यार्थी मोफत शिक्षण घेतात. कुमुदिनी चव्हाण या उत्तम वक्त्या आहेत, रायगड जिल्ह्यात त्यांना व्याख्यात्या म्हणूनही ओळखले जाते. रायगड जिल्ह्यात त्यांचा मोठा जनसंपर्क आहे. भारतीय मराठा महासंघाच्या त्या रायगड जिल्हाअध्यक्षा आहेत. रायगड जिल्ह्यातील वाढती बेरोजगारी या विषयी कुमुदिनी यांनी चिंता व्यक्त केली आहे त्या म्हणतात, रोजगार निर्माण झाला नाही तर गाव खेडी ओस पडतील. रोजगार, आरोग्य, शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी लोकप्रतिनिधी असतो पण दुर्दैव रायगडच्या निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीना ते 40 वर्षात समजलेलं नाही. म्हणून कुमुदिनी यांनी लोकप्रतिनिधी होण्याचे ठरविले आहे. त्या वंचित बहुजन आघाडीकडून रायगडची लोकसभा लढविणार आहेत.
गाव खेड्यात फिरताना गावातील 70% घरानां कुलूप लावलेलं दिसत, मोजकीच वयस्कर माणसे गावात दिसतात. गावात लहान लेकरंच नाहीत म्हणून शाळेच्या इमारती आहेत, शिक्षक आहेत पण मुलं एक किंवा दोन..अशी भयानक स्थिती निर्माण झाली झाली आहे. हे चित्र बदलण्यासाठी लोकसभा लढवावी लागेल, असे त्या म्हणतात.
रायगड मध्ये पाऊस खूप पडतो, पुर, दरडी यात जीवित हानी व वित्त हानी मोठया प्रमाणात होते. यावर कायमचा उपाय पुनर्वसन व उपाय योजना राबविण्याचे काम मी करेल. आदिवासी लोकांची पडकी घर सुकलेले चेहरे, कुपोषित बालक पाहून अंतःकरण भरून येते. मला यांच्या विकासासाठी लोकसभेत जावच लागेल. अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
अनेक गावात नळ योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. पाईप लाईन देखील आहेत पण पाणीच नाही. मी दिल्लीत गेले तर रायगडच्या प्रत्येक घरात पाणी आणि लाईट फुकट देईल. अपूर्ण रस्ते,धरणाचे काम एका वर्षात पूर्ण करून देईल. हे माझे वचन आहे, असे कुमुदिनी चव्हाण मतदारांना भावनिक आव्हान केले आहे.