(चिपळूण)
क्षत्रिय धारपवार चॅरिटेबल संस्था अध्यक्ष ॲड. राजनदादा पवार यांचे मार्गदर्शनाखाली क्रिडा विभागाच्यावतीने पवन तलाव, चिपळूण येथे रविवार दि. ०२ मार्च २०२५ रोजी ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे हे पहिले वर्ष असून यात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, मुंबई येथील संघ सहभागी होत आहेत.
सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने क्रिडा विभाग अध्यक्ष श्री प्रदिप पवार, सहकार्याध्यक्ष श्री सचिन पवार, श्री प्रविण पवार व चिपळूण मधील पदाधिकारी व बांधव प्रयत्न करत आहेत अशी माहिती राज्य प्रसिध्दीप्रमुख श्री संदेश पवार यांनी दिली.