(रत्नागिरी)
कोकण भूमी प्रकल्प ग्रस्त कृती समितीच्या मागणीबाबत भाजप पदाधिकाऱ्यांनी विशेष शिष्टाई करत थेट केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दाणवे यांच्याशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले. कोकण रेल्वे प्रशासनानेही बैठकीचा शब्द दिल्यामुळे कृती समितीने हे बेमुदत आंदोलन तूर्तास स्थगित केले. भाजपचे तालुकाध्यक्ष दादा दळी यांनी उपोषणकर्त्यांना लिंबू पाणी देऊन उपोषण सोडल्याची घोषणा केली.
गेले अनेक वर्षे रेल्वे प्रसासनाशी आपल्या न्याय हक्कासाठी झगडत आहे. परंतु रेल्वे प्रशासनाने कधी हा विषय गांभीयनि पाहिला नाही. अखेर आज सुमारे शंभरपेक्षा जास्त प्रकल्पग्रस्त रेल्वे स्टेशनच्या आवारात बेमुदत उपोषणाला बसले. दुपारनंतर भाजप तालुकाध्यक्ष दादा दळी व जिल्हा सरचिटणीस सतेज नलावडे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. या वेळी रेल्वेचे रिजनल मॅनेजर श्री. कांबळे उपस्थित होते. भाजप नेते बाळ माने, जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांना दूरध्वनीवरून संपर्क केला. आम्ही केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी संपर्क करून यामध्ये मार्ग काढण्याची विनंती करतो, असे सांगितले.
शेवटी रिजनल मॅनेजर कांबळे यांनी उपोषणकर्त्यांना सांगितले, आपल्या मागण्या रास्त आहेत. मी या विषयात बेलापूरच्या वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क करून आपल्यासोबत आठ दिवसात बैठक लावतो. आता उपोषण मागे घ्या, अशी विनंती केली. त्यावर प्रकल्पग्रस्तांनी आपली पुढील होणाऱ्या बैठकीच्या आश्वासनावर आजचे उपोषण मागे घेतले.