(संगमेश्वर / प्रतिनिधी)
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर सप्तलिगी वांद्री येथे कंटेनर आणि दुचाकी अपघात झाल्यानंतर कंटेनर चालक पसार झाला आहे. त्यांचा शोध पोलिस घेत आहेत. संगमेश्वर पोलिस ठाण्यात कंटेनर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र येथील खड्ड्यांमुळे अपघात होऊन तरुणाला नाहक आपला जीव गमवावा लागला आहे.
रत्नागिरी वरवडे येथील किरण प्रकाश विचारे हे पोस्टमन होते, दुचाकीवरून घरी जात असताना गोव्याहून मुंबईला जाणाऱ्या कंटेनर चालकाने समोरून त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात कंटेनरखाली थेट दुचाकीचा सापडली. दुचाकीचा अक्षशः चेंदामेंदा होऊन यातच किरण विचारे हा तरुण जागीच ठार झाला. अपघात झाल्यानंतर कंटेनर चालक निजामउद्दीन जमालउद्दीन हा पसार झाला आहे. त्याच्यावर संगमेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंचक्रोशी मंडळाकडून किरणला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण
या अपघातात वरवडे ( मधलीवाडी) येथील किरण प्रकाश विचारे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. किरण यांच्या अपघाती निधनाचे वृत्त कळताच वरवडे गावावर शोककळा पसरली. दुसऱ्या दिवशी (सकाळी) त्यांच्यावर अत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी रत्नागिरी जयगड खंडाळ्यातील मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. किरण विचारे यांच्या पश्चात पत्नी दोन वर्षाचा मुलगा आई व एक भाऊ आहे. किरण यांचा स्वभाव अत्यंत शांत आणि हसतमुख होता. विचारे कुटुंबियांच्या दुःखात सर्वजण सामील असल्याचे सांगत वरवडे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ परिवार आणि स्नेहवर्धक मंडळ परिवाराकडून किरण विचारे या तरूणाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
आणखी किती असे बळी घेणार…
महामार्गावरील खड्ड्यातून व धुळीतून प्रवास करताना एखाद्या वाहनचालक किंवा प्रवाशांचे नाहक बळी गेला. अपघातात अशा प्रकारचे बळी जाऊन त्यांचे कुटुंब उध्वस्त होत आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेळीच दखल घेत सर्विस रोड सुस्थितीत केला असता तर, या दुचाकी स्वराचा जीव वाचला असता अशा संतप्त भावना नागरिकांमधून व्यक्त केल्या जात असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे निर्गट अधिकारी आणखी किती असे बळी घेणार असा सवालही आता उपस्थितीत होत आहे.