(चिपळूण)
सह्याद्री शिक्षण संस्था संचलित न्यू इंग्लिश स्कूल व जुनिअर कॉलेज खेर्डी चिंचघरी सती या विद्यालयात शैक्षणिक वर्ष 2024-25 यावर्षीची पहिली पालक सभा व विद्यार्थी गुणगौरव समारंभ चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार, संस्थेचे कार्याध्यक्ष शेखर निकम यांच्या उपस्थितीत पार पडला. या पालक सभेच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय वरेकर हे होते. सभेची सुरुवात दीप प्रज्वलन व संस्थापक स्वर्गीय गोविंदरावजी निकम व स्वर्गीय अनुराधाताई निकम यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.
आमदार शेखर निकम यांच्या हस्ते इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा, इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षा,एन एम एस परीक्षा, सारथी शिष्यवृत्ती या स्पर्धा परीक्षेमध्ये गुणवंत विद्यार्थी तसेच विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थी, इ .10वी 12वी प्रथम तीन क्रमांकाचे विद्यार्थी, नवोदय विद्यालयात निवड झालेले,नासामध्ये निवड झालेले विद्यार्थी, इन्स्पायर अवॉर्ड, बाहुली नाट्यातून रस्ता सुरक्षा उपक्रम इत्यादी विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा व पालकांचा सत्कार करण्यात आला. तसेच गांधी रिसर्च फाउंडेशन जळगाव आयोजित गांधी तीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय प्रतियोगिता या स्पर्धेत विद्यालयाचा राज्यात प्रथम क्रमांक आल्याबद्दल व मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेत तालुक्यात प्रथम क्रमांक आल्याबद्दल शेखर निकम यांच्या हस्ते विद्यालयाचा सत्कार करण्यात आला.
यानंतर शालेय शिस्त व नियम व स्पर्धा परीक्षा, शालेय परीक्षा संभाव्य नियोजन या विषयावर सतीश पालकर यांनी तर शालेय वर्ष शालेय उपक्रम या विषयावर .शिवाजी पाटील यांनी व विविध शासकीय योजना या विषयावर सुलोचना जगताप यांनी मार्गदर्शन केले.
आपली स्पर्धा ही जगाशी आहे त्यादृष्टीने शाळेचा विद्यार्थी घडला पाहिजे त्यासाठी पालक आणि शिक्षक यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी देखील कायम मेहनत घेतली पाहिजे.अशा सभेच्या माध्यमातून शिक्षक आणि पालक यांच्यातील संवाद सकारात्मक होऊन विद्यार्थी शिकण्याच्या दृष्टीने शैक्षणिक वातावरण निर्माण झाले पाहिजे. विद्यालयाने मिळवलेली गुणवत्ता असेच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावे त असे प्रतिपादन .शेखर निकम यांनी केले. सदर पालक सभेला 900हून अधिक पालक उपस्थिती होते. विद्यालयाच्या विविध उपक्रमांची संस्थेच्या आतापर्यंतच्या कार्याची माहिती प्राचार्य संजय वरेकर यांनी दिली.
या सभेला आमदार शेखर निकम, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष नितीन ठसाळे, प्रमोद पवार, पालक शिक्षक संघाचे सर्व सदस्य, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.संजय वरेकर, उपमुख्याध्यापक विश्वास दाभोळकर, पर्यवेक्षिका राजेशिर्के मॅडम, पर्यवेक्षक पांडुरंग पाटील, विद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. सभेचे सूत्रसंचालन संतोष हातणकर यांनी केले, आभार टी एस पाटील यांनी मानले.