(चिपळूण)
न्यू इंग्लिश स्कूल व ज्यूनि कॉलेज खेर्डी चिंचघरी सती विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये NMMS परीक्षेत गुणवत्ता यादीत 12 व सारथी शिष्यवृत्ती 8 व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत 12 विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत येऊन अद्वितीय यश संपादन करून शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा लावण्याचे कार्य केले.
या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व मार्गदर्शक शिक्षकांना कु.प्रांजली महेश शिंदे हीचे पालक श्री.महेश शिंदे यांनी सोनचाफ्याचे एक झाड देवून सन्मानित केले व सर्व मार्गदर्शक शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत सर्व मार्गदर्शक शिक्षकांचे व विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.संजय वरेकर यांचे आभार व्यक्त केले.
या प्रसंगी श्री.महेश शिंदे, त्यांच्या सुविदय पत्नी, मुख्याध्यापक श्री.संजय वरेकर, मार्गदर्शक शिक्षक श्री.आनंद भुवड, श्री.सतीश पालकर, श्री.योगेश नाचणकर, कु.शर्मिला म्हादे, सौ.रुपाली भुवड, सौ.सुलोचना जगताप, श्री.सुर्यवंशी ए.के, सौ.वर्षा चव्हाण, सौ.विनया धांगडे आदी मान्यवर उपस्थित होते.