(चिपळूण)
न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज खेर्डी चिंचघरी ( सती ) ता.चिपळूण जि.रत्नागिरी या विद्यालयात चिपळूण तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधून NASA व ISRO या अंतराळ संशोधन संस्थांना भेट देणाऱ्या चार विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.कु.दक्ष दिनेश गिजये व कु.इच्छा सिताराम कदम या NASA कॅम्प तर कु.चिन्मय गणेश दळवी व कु.वैदेही विनायक गजमल या ISRO कॅम्प केलेल्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला.
सती विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.संजय वरेकर,उपमुख्याध्यापक श्री. विश्वास दाभोळकर,पर्यवेक्षक श्री.पांडुरंग पाटील,ज्येष्ठ शिक्षिका सौ.सुनिता वारंग , विज्ञान शिक्षक व जिल्हा विज्ञान मंडळाचे उपाध्यक्ष श्री.शिवाजी पाटील, कलाशिक्षक श्री. तुकाराम पाटील तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या उपस्थितीत हा सन्मान समारंभ संपन्न झाला.
सती विद्यालयाने जिल्हा परिषदेच्या स्पेस कॅम्प निवड परिक्षेसाठी सलग दोन वर्षे मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करून तालुक्याचे नाव रोषण करण्यात मोठे योगदान दिले आहे. तालुक्यातील 8 विद्यार्थ्यांची सदर कँपसाठी निवड झाली होती त्यांपैकी सन्मानित केलेल्या 4 विद्यार्थांनी पुढील शिक्षणासाठी सती विद्यालयाची निवड केली आहे.विद्यार्थांच्या सर्वांगीण विकासासाठी सती विद्यालयात सातत्यपूर्ण विविध उपक्रम राबविले जातात.