(जाकादेवी / राहूल अलकटवार)
सालाबादप्रमाणे सन २०२४/२०२५ या शैक्षणिक वर्षाच्या खालगाव बीटच्या क्रीडास्पर्धा मा .शिक्षण विस्तार अधिकारी सौ. सशाली मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली बीटस्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन मोहिनी मुरारी मयेकर माध्यमिक विद्यालय चाफे शाळेच्या मैदानावर करण्यात आले. या क्रीडा स्पर्धेत सांघिक व वैयक्तिक क्रीडाप्रकारातील लहान गट व मोठ्या गटांच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या.
वैयक्तीक क्रीडा प्रकार
लहान गट मुलगे या गटामध्ये 50 मीटर धावणे- दर्शन अनंत किंजळे प्रथम, आरुष संदेश धामणे द्वितीय, लांब उडी – आरुष संदेश धामणे प्रथम, दर्शन अनंत किंजळे द्वितीय, उंच उडी – अर्णव संदीप सांबरे प्रथम, शौर्य संदीप गावणकर द्वितीय, थाळीफेक – आराध्या रोहिदास गोनबरे प्रथम, अर्णव दीपक घाणेकर द्वितीय, गोळा फेक – तन्मय तानाजी मायंगडे प्रथम, गितेश गणेश गोताड द्वितीय, बुद्धिबळ – प्रेषित प्रमोद जाधव प्रथम, वृषभ धोंडू कुवार द्वितीय, बॅडमिंटन – प्रज्वल पांडुरंग शेजाळ प्रथम ,श्लोक संतोष मायंगडे द्वितीय
लहान गट मुली या गटामध्ये 50 मीटर धावणे – उर्मिला सूर्यकांत सुवरे प्रथम, आराध्या संजय सुर्वे द्वितीय, लांब उडी- आदिती रामचंद्र गोताड प्रथम, आराध्या यशवंत धोपट द्वितीय, उंच उडी – उर्मिला सूर्यकांत सुवरे प्रथम, दुर्वा देवेंद्र कुवार द्वितीय, थाळीफेक- परी नंदकुमार पंडित प्रथम, यशस्वी सुरेश मांडवकर द्वितीय, बुद्धिबळ – स्पृहा संकेत देसाई प्रथम, तन्वी लहू आलिम द्वितीय, बॅडमिंटन – शुभ्रा रुपेश अलीम प्रथम, स्पृहा संकेत देसाई द्वितीय
मोठा गट मुलगे 100 मीटर- धावणे निशांत संजय डापले प्रथम, यश संतोष गावणकर द्वितीय, उंच उडी – मंदार महेश पानगले प्रथम, आर्यन विजय मोरे द्वितीय, उंच उडी – सोहम महादेव कुळ्ये प्रथम, श्रेयस संदीप पांचाळ द्वितीय, थाळीफेक – हर्ष अरविंद सागवेकर प्रथम, मंदार महेश पानगले द्वितीय, गोळा फेक – सार्थक संतोष गुरव प्रथम, धीरज हेमंत कुवार द्वितीय, बुद्धिबळ – सार्थक शशांक गुरव प्रथम, गणेश सागर गोनबरे द्वितीय
मोठा गट मुली 100 मीटर धावणे- सानवी विष्णू गोताड प्रथम, चांदणी चंद्रकांत गोताड द्वितीय, लांब उडी -कार्तिकी प्रवीण कांबळे प्रथम, आर्या अरविंद गोंधळी द्वितीय, उंच उडी – जानवी दीपक लिंगायत प्रथम, आर्या मनोहर कुळये द्वितीय, थाळीफेक – वंशिका अनंत गवळी प्रथम, सुहानी सुरेश गावणकर द्वितीय, बुद्धिबळ- अनुष्का प्रशांत देसाई प्रथम, पूर्वा गजानन रहाटे द्वितीय, बॅडमिंटन – संयुजा सुरेश काताळे प्रथम, कार्तिकी प्रवीण कांबळे द्वितीय क्रमांक प्राप्त केले.
सांघिक क्रीडा प्रकार
लहान गट मुलगे कबड्डी – विजेता केंद्र अगरनरळ, उपविजेता केंद्र बोंडये, खो-खो- विजेता केंद्र बोंडये, उपविजेता केंद्र तरवळ,
लहान गट मुली कबड्डी – विजेता केंद्र अगरनरळ, उपविजेता केंद्र बोंडये, खोखो – विजेता केंद्र अगरनरळ, उपविजेता केंद्र बोंडये, लंगडी- विजेता केंद्र तरवळ, उपविजेता केंद्र ओरी,
मोठा गट मुलगे कबड्डी- विजेता केंद्र बोंडये उपविजेता केंद्र ओरी, खो खो – विजेता केंद्र आगरनरळ, उपविजेता केंद्र बोंडये,
मोठा गट मुली कबड्डी- विजेता केंद्र आगरनरळ ,उपविजेता ओरी, खो खो – विजेता केंद्र आगरनरळ, उपविजेता केंद्र बोंडये, लंगडी – विजेता केंद्र आगरनरळ, उपविजेता केंद्र तरवळ झाले असून अतिशय उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून आगरनरळ केंद्राने मोठ्या गटाची चॅम्पियन ट्रॉफी व तरवळ केंद्राने लहान गटाची चॅम्पियन ट्रॉफी पटकावली.
क्रीडा स्पर्धेच्या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाप्रसंगी मोहीनी मुरारी शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष रोहित मयेकर सपत्नीक हजर होते. तसेच संस्थेचे संचालक माचिवले , संस्थेच्या प्राचार्या स्नेहा पालये, ओरी केंद्राचे केंद्रीय प्रमुख प्रकाश कळंबटे बोंडये केंद्राचे केंद्रप्रमुख राणे सर, खालगाव बीट मुख्याध्यापक वळवी सर आणि बीटातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, उपशिक्षक, पालक उपस्थित होते. क्रीडा स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी खालगाव बीटातील शिक्षकांनी महत्वपूर्ण सहकार्य केले.