(चिपळूण / योगेश पेढांबकर)
गोवळकोट एज्युकेशन सोसायटी संचलित खदिजा इंग्लिश मीडियम स्कूल व खातून अब्दुल्लाह या विद्यालयाने कोंकण सिरात कमिटी चिपळूण, आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व व नाअत स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. सदर स्पर्धेमध्ये विद्यालयाने प्रथम क्रमांक पटकाविला व जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत कु.सिद्रा इकबाल वांगडे हिने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविला. यामुळे संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात विद्यालयाने मानाचा तुरा रोवला. त्याचबरोबर नाअत स्पर्धेसाठी इयत्ता ७वी ते ९ वी च्या विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला होता. यामध्ये अनुक्रमे कु. हफसा हमदुले, आशना तांबे,सर्जीला ढेनकर,हुमेरा घारे, मरियम शेख, हसिबा बोट, कैनात तुरुक, फरहात चौगले, नुमैर पठाण, सफवान पठाण आदी सर्व गुणवंत विद्यार्थी सहभागी होते.
शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारी कोंकण सिरत कमिटी, चिपळूण यांच्यामार्फत भव्य दिव्य अशी चिपळूणमध्ये जिल्हास्तरीय वक्तृत्व व नाअत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेदरम्यान गोवळकोट एज्युकेशन सोसायटी संचलित, खदीजा इंग्लिश मिडीयम स्कूल व खातुन अब्दुल्लाह सेकंडरी स्कूल गोवळकोट विद्यालयाचे जिल्हास्तरीय वक्तृत्व व नाअत स्पर्धेत अव्वल स्थानी क्रमांक पटकाविला.
या कार्यक्रम प्रसंगी स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील विविध शाळांनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेदरम्यान वक्तृत्व स्पर्धेसाठी पालक व मार्गदर्शक शिक्षिका सौ. फरजाना वांगडे यांनी काम पाहिले. जिल्हास्तरीय नाअत स्पर्धेसाठी मार्गदर्शक शिक्षक श्री. अब्दुल रेहमान चौगले, शिक्षिका सौ.उमेमा चिपळूणकर, सौ. फरजाना वांगडे,सालेहा शेख, रुक्सार परकार, कलाशिक्षक श्री.उदय मांडे आदि शिक्षक मार्गदर्शक यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या कोंकण सिरत कमिटी, चिपळूण या संस्थेचे विद्यमान अध्यक्ष श्री. सज्जाद खान, श्री. शाहनवाज शहा, कोंकण सिरत कमितीचे विद्यमान सेक्रेटरी श्री.मुजाहिद मेयर, गोवळकोट एज्युकेशन सोसायटीचे व्हा.चेअरमन श्री.जफर कटमाले तसेच प्रमुख मान्यवर श्री.इमरान कोंडकरी, मरीन इंजिनियर मर्चंट नेव्ही ऑफिसर, तसेच इतर अनेक मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते.
सदर स्पर्धेसाठी प्रेरणास्थान संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.ऊरुसा खतीब, विद्यालयाचे मार्गदर्शक मुख्याध्यापक श्री.इरफान शेख,विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच स्पर्धेमध्ये यशस्वी विद्यार्थी यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या यशाबद्दल गोवळकोट एज्युकेशन सोसायटीचे विद्यमान चेअरमन श्री. डॉ. इसहाक खतीब, व्हाईस चेअरमन श्री.जफर कटमाले, संस्थेचे सेक्रेटरी श्री.मुजहिद मेयर, विद्यालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.ऊरूसा खतीब,विद्यालयाचे विद्यमान मुख्याध्यापक श्री.इरफान शेख, तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी विशेष अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सौ.कोकण सिरत कमिटीचे व संस्थेचे विद्यमान सेक्रेटरी श्री. मुजहिद मेयर यांनी केले.