(जाकादेवी / वार्ताहर)
कास्ट्राईब शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य संघटनेचे राज्य अध्यक्ष आकाश तांबे राज्य सरचिटणीस रवींद्र पालवे कोषाध्यक्ष प्रदीप वाघोदे राजू रणदिवे पुणे यांनी मा . शरद गोसावी शिक्षण संचालक प्राथमिक पुणे यांची भेट घेऊन शिक्षकांच्या विविध प्रश्नां संदर्भात चर्चा करण्यात आली. या बैठकीत त्यांनी प्रश्न सोडविण्याचे अभिवचन दिले. यामध्ये प्रामुख्याने राज्यातील केंद्रप्रमुखांची रिक्त पदे तात्काळ भरण्याची कार्यवाही सुरू झाली आहे असे सांगितले मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे प्रश्न आवर्जून सोडवले जातील हे अधोरेखित केले.
पुणे येथे प्राथमिक शिक्षण विभागाचे संचालक शरद गोसावी यांची कास्ट्राईब शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्याचे राज्याध्यक्ष आकाश तांबे,सरचिटणीस रविंद्र पालवे ,कोषाध्यक्ष प्रदीप वाघोदे, रत्नागिरी जिल्हा. टी. सेल प्रमुख कुणाल तडवी, संघटक राजू रणदिवे, यांच्या समवेत बैठक झाली. यावेळी प्राथमिक शिक्षकांच्या अनेक प्रश्नांवर सविस्तर करण्यात आली.
महाराष्ट्रात केंद्रप्रमुख पदे रिक्त असून भरती बाबत विचारणा करण्यात आली.केंद्रप्रमुख पद भरती बाबत शरद गोसावी यांनी माहिती देतांना केंद्रप्रमुख पद भरतीचे निकष सांगत ६ वर्षे सेवा पूर्ण झालेल्या शिक्षकांना परीक्षेद्वारे भरती करणार असून ५० % पदे ही सेवा ज्येष्ठ शिक्षकांमधून भरली जाणार असल्याची माहिती देत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील पद भरतीची प्रक्रिया झाली असून काही जिल्ह्यात शिक्षकांनी आक्षेप घेतल्याने व न्याय प्रविष्ट असल्याने प्रक्रिया प्रलंबीत आहे लवकरच ही पदं भरती करु, असे आश्वासन देण्यात आले. याचर्चेमुळे लवकरच शिक्षकांना न्याय मिळवून देण्यात संघटनेला मोठे यश येणार आहे. पवित्र पोर्टल बाबत शासनाचे संघटनेच्या वतीने आयुक्त सुरेश मांढरे यांचे विशेष कौतुक करण्यात आले व आभार प्रकट करण्यात आले.
यावेळी सरचिटणीस पालवे यांनी आभार व्यक्त केले. महाराष्ट्रातील संघटनेच्या जिल्हाध्यक्षांनी केंद्र प्रमुख पद भरती बाबत आपल्या जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेशी संपर्क साधून आढावा घेवून काय स्थिती आहे याची माहिती घेवून संघटनेशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.