(लांजा)
लांजा क्रिकेट स्टार चा सुपरस्टार खेळाडू कैलासवासी दीपक जानकर यांचे काही दिवसापूर्वी अचानक निधन झाल्यामुळे त्यांच्या स्मरणार्थ लांजा क्रिकेट स्टार क्लब ने जिल्हास्तरीय प्राथमिक शिक्षकांच्या क्रिकेट स्पर्धा लांजाच्या नारकर मैदानावरती आयोजित केल्या होत्या. या स्पर्धेमध्ये राजापूर, रत्नागिरी, खेड, चिपळूण, दापोली, गुहागर मधील अनेक शिक्षक आपले संघ घेऊन सहभागी झाले होते.
या स्पर्धेमधील अतितटीच्या अंतिम सामन्यात लांजा क्रिकेट स्टार संघाने विजेतेपद पटकावले, तर संघर्ष इलेव्हन खेड संघ उपविजेता ठरला. बेस्ट बॅट्समन म्हणून संघर्ष 11 संघाच्या गणेश यांना तर बेस्ट बॉलर म्हणून यांचा स्टार संघाचे दिनेश झोरे यांची निवड झाली. मालिकावीर म्हणून संपूर्ण मालिकेमध्ये सर्वाधिक धावा आणि विकेट घेणारे उमेश जाधव यांना मिळाले.
या स्पर्धेचे उद्घाटन कैलासवासी दीपक जानकर यांचे वडील व नातेवाईक यांच्या हस्ते संपन्न झाले, तर बक्षीस वितरण समारंभ प्राथमिक शिक्षक पतपेढीचे संचालक अंकुश चांगण व राजेंद्र चांदिवडे यांच्या उपस्थितीत पार पडले. ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडण्यासाठी लांजा क्रिकेट स्टार संघातील सर्व खेळाडूंनी मेहनत घेतली.
Follow us on Google News : https://news.google.com/s/CBIw9dzq7KQB?sceid=IN:en&sceid=IN:en&sceid=IN:en&r=0&oc=1