(ठाणे)
मागील 12 वर्षापासून ग्रामपंचायत स्तरावर काम करणाऱ्या संगणकपरिचालकांना ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा व किमान वेतन देणे या प्रमुख मागणीची शासन दखल घेत नसल्याने मुख्यमंत्री मा.एकनाथजी शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानावर 24 सप्टेंबर रोजी मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा पोलीस प्रशासनाने कोर्टनाका परिसरात अडवला, मोर्चात हजारो संगणकपरिचालक दाखल झाले होते,या मोर्चाची दखल घेऊन मा.मुख्यमंत्र्यांनी संघटनेच्या शिष्टमंडळाला चर्चेस बोलवले असता, त्यांच्याकडे ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा व किमान व किमान वेतन देण्याची मागणी मांडली. त्यावेळी त्यांनी शासनस्तरावर बैठक घेऊन न्याय देण्यात येईल, असे सांगितल्याने आंदोलन स्थगित केले असल्याचे राज्यअध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांनी सांगितले.
याबाबत सविस्तर वृत्त की, मागील 12 वर्षापासून ग्रामपंचायत स्तरावर सुमारे 7 कोटी ग्रामीण जनतेला ऑनलाईन व ऑफलाईन शासनाच्या सेवा देण्याचे काम करणाऱ्या संगणकपरिचालकांना अतिशय तुटपुंजे मानधन मिळते. त्यामुळे शासनाने ग्रामपंचायत स्तरावर कर्मचारी दर्जा व किमान वेतन देऊन न्याय दयावा यासाठी अनेक वेळा शासन स्तरावर पाठपुरावा केला, तरीही या मागणीची दखल घेतली जात नसल्याने मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानावर मंगळवारी 24 सप्टेंबर 2024 रोजी मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी सदरील मोर्चा पोलीस प्रशासनाने कोर्टनाका परिसरात अडवला, परंतु जो पर्यंत मुख्यमंत्री या मोर्चाची दखल घेत नाहीत तो पर्यंत आंदोलनावर ठाम राहिल्याने मुख्यमंत्री शिंदे यांनी आंदोलनाची दखल घेऊन 25 सप्टेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता चर्चेस बोलवले.
दरम्यान, निवेदन घेतले व चर्चा केली असता, त्यांना मागील 12 वर्षापासून काम करणाऱ्या संगणकपरिचालकांची व्यथा सांगण्लीयात आली. संगणकपरिचालकांना ग्रामपंचायत स्तरावर कर्मचारी दर्जा व किमान वेतनाची आमची प्रमुख मागणी असून आपण आमचा निर्णय घ्यावा असे सांगण्मुयात आले. याबाबत मुख्यमंत्री म्हणाले, या विषयावर शासनस्तरावर बैठक घेऊन संगणकपरिचालकांना न्याय देण्यात येईल. त्याचवेळी त्यांनी बैठक लावण्याचे निर्देश संबंधितांना लेखी स्वरूपात दिले. त्यावेळी आंदोलन स्थळावर येऊन उपस्थित सर्व जिल्हाध्यक्ष यांच्यासोबत चर्चा करून मुख्यमंत्री यांनी आंदोलनाची दखल घेतल्याने त्यांच्यावर अपेक्षा ठेऊन ठाणे येथील आंदोलन स्थगित करण्यात आले असल्याचे महाराष्ट्र राज्य संगणकपरिचालक संघटनेचे राज्यअध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांनी सांगितले.
सदर आंदोलनात रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष श्री समीर ओक, सल्लागार श्री स्वप्नील आग्रे, गुहागर तालुका अध्यक्ष श्री तारेश हळदणकर तसेच संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातून अंदाजे 200 ते 250 संगणक परिचालक सदर मोर्चाला ठाणे येथे उपस्थित होते.