( संगमेश्वर )
तालुक्यातील बुरंबाड येथील जुगार अड्ड्यावर छापा मारत पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत साहित्यासह ५६२ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
कृष्णा अर्जुन गमरे (रा. बुरंबाड, संगमेश्वर) असे गुन्हा दाखल केलेल्या संशयिताचे नाव आहे. ही कारवाई गुरुवारी दुपारी करण्यात आली. बुरंबाड येथील एका दुकानाच्या मागील बाजूस मटका जुगार चालवत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्या आधारे पोलिसांनी कारवाई केली आणि सर्व माल जप्त केला. याप्रकरणी अधिक तपास संगमेश्वर पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक विवेक साळवी करीत आहेत.