(गावखडी / वार्ताहर)
पावस एज्युकेशन सोसायटीच्या प्राचार्य श्रीमती साजिदा हनीफ दसुरकर यांना रॉयल एज्युकेशन सोशल वेल्फेअर पनवेल यांच्याकडून जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला. झुलेखा दाऊद काझी हायस्कूल व मुराद उमर मुकादम ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स व कॉमर्स व राबिया शेख अहमद नाखवा जुनियर कॉलेज ऑफ सायन्स या विभागाचे विकासाच्या दृष्टीने केलेल्या कामाबद्दल दसुरकर यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
प्रायमरी पासून जुनियर कॉलेज पर्यंतचे विद्यार्थी यांची शिस्त, प्रशाला व कॉलेजचा दरवर्षी शंभर टक्के निकाल तसेच हँडबॉल, बास्केटबॉल स्पर्धेत येथील मुले विभागीय स्तरावर पोहोचली आहेत. तर विज्ञान प्रदर्शन, स्काऊट गाईड, वकृत्व स्पर्धा यामध्ये विद्यार्थी राज्यस्तरापर्यंत पोहोचले आहेत. हे करत असताना शाळेला सायन्स लॅब अटल लॅब मिळून विद्यार्थ्यांची खरी विज्ञानाची जाणीव करून देण्यात येत आहे. संस्थेच्या उपाध्यक्ष श्री लाईक फोंडू यांच्याकडून प्रशालेच्या साजिदा दसुरकर यांचा शॉल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे जॉईन सेक्रेटरी मन्सूर काजी यांनी भाषण केले. सदरील समारंभाला संस्थेचे सर्व पदाधिकारी शफिशेट काजी, मुदस्सर मुकादम, अक्रम नाकवा, सलीम काझी, रौफ सावकार आणि हनीफ मुल्ला व इतर सर्व पदाधिकारी प्रशालीचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते
फोटो: पावस एज्युकेशन सोसायटीच्या प्राचार्य श्रीमती साजिदा हनीफ दसुरकर यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करताना संस्थेचे उपाध्यक्ष श्री. लाईक फोडू, श्री.मन्सूर काजी, श्री.शफी काझी, श्री.मुदसर मुकादम, अजमल मुल्ला, रिजवान नाखवा
(फोटो : दिनेश पेटकर गावखडी)