(रत्नागिरी)
गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात भरवण्यात आलेल्या झेप सांस्कृतिक महोत्सवाचा पहिला दिवस व दुसऱ्या दिवसाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या उद्याजकतेच्या नवकल्पकतेचा आणि कौशल्याचा उत्सव ठरला. महोत्सवातील मुख्य आकर्षण म्हणजे उद्योजक श्री आनंद देसाई यांच्या देणगीतून ‘जयंतराव देसाई नवउद्योजक करंडक’, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या उद्योजकीय कौशल्याची ताकद दाखवली. यंदाचा प्रतिष्ठित करंडक यश देओदास आणि त्याच्या ‘देवा किचन’ समूहाने जिंकला, ज्यांनी तब्बल ₹३०,००० नफा कमावत आपली छाप सोडली. या करंडकासोबतच विजेत्या संघाला ₹६,००० चे रोख पारितोषिक प्रदान करण्यात आले.
उद्योजक कौशल्याचा भव्य सोहळा
‘Entrepreneurship’ स्पर्धेत ५ विभागांचा समावेश होता –
1. फूड इंडस्ट्री – खाद्यपदार्थ निर्मिती व विक्री
2. सर्व्हिस इंडस्ट्री – सेवा व्यवसाय (नॉन-हँडमेड उत्पादने)
3. प्रॉडक्ट इंडस्ट्री – हँडमेड उत्पादने
4. आयटी इंडस्ट्री – वेबसाइट्स, अॅप्लिकेशन्स, सॉफ्टवेअर्स
5. फूड कॉन्टेस्ट – खाद्य स्पर्धा
या स्पर्धेमध्ये एकूण ७४ विद्यार्थ्यांनी भाग घेतला आणि मिळून ₹१,६०,००० चे उत्पन्न कमावले.
फूड इंडस्ट्रीतील चमकदार विजेते:
प्रथम क्रमांक: शर्विल संसारे – ‘Thanda Thanda Cool Cool’
₹3,000 गुंतवणूक, ₹18,000 विक्री, ₹15,000 नफा
द्वितीय क्रमांक: नूपुर मराठे – ‘Love at First Bite’
₹10,000 गुंतवणूक, ₹23,000 विक्री, ₹13,000 नफा
तृतीय क्रमांक: अथर्व सरदेशपांडे
₹9,000 गुंतवणूक, ₹21,000 विक्री, ₹12,000 नफा
प्रॉडक्ट इंडस्ट्रीतील यशस्वी नाव:
प्रथम क्रमांक: संपदा महाबळ
₹350 गुंतवणूक, ₹1,350 विक्री, ₹1,000 नफा
द्वितीय क्रमांक: बतुल बारगिर
₹5,000 गुंतवणूक, ₹12,580 विक्री, ₹7,580 नफा
सर्व्हिस इंडस्ट्रीतील चमकता तारा:
प्रथम क्रमांक: तुबा अलजि
₹500 गुंतवणूक, ₹2,000 विक्री, ₹1,500 नफा
‘देवा किचन’चा जबरदस्त विक्रम:
यश देओदास आणि त्याच्या समूहाने फक्त ₹५,५०० गुंतवणूक करून ₹३५,००० ची विक्री केली आणि ₹३०,००० नफा मिळवत सर्वोत्कृष्ट कामगिरी केली. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे २०२४ साठी जयवंतराव देसाई नवउद्योजक पुरस्काराचा मानकरी म्हणून त्यांची निवड झाली. विजेत्या संघाला या करंडकासोबतच ₹६,००० चे रोख पारितोषिक प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाचे परीक्षक व प्रमुख पाहुणे
स्पर्धेचे परीक्षण प्राध्यापक नीता खामकर आणि प्राध्यापक परेश गुरव यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी श्री.लोवलेकर,श्री विवेक भावे, डॉ.चंद्रशेखर केतकर, श्री सचिन वहाळकर , सी ए मंदार गाडगीळ, प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर आणि सांस्कृतिक विभागप्रमुख आणि झेप समन्वयक डॉ. आनंद आंबेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना प्रोत्साहन देणारा ठरला आणि त्यांच्या उद्योजकीय कौशल्याला नवी दिशा देणारा होता.”झेप 2024″ चा हा महोत्सव विद्यार्थ्यांच्या सांस्कृतीक प्रतिभेला वाव देणारा व सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला.
झेप महोत्सव समन्वयक डॉ आनंद आंबेकर आणि प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांनी खुप मेहनत घेतली आहे. विद्यार्थी सचिव मिहिका केनवडेकर , सांस्कृतिक प्रतिनिधी स्वराज साळुंखे , उद्योजक विद्यार्थी प्रमुख पुर्वा कदम आणि कोअर कमिटी आणि विद्यार्थी मंडळ खुप मेहनत घेतली आहे.
रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह श्री.सतीश शेवडे, सह कार्यवाह प्रा.श्रीकांत दुदगिकर, प्राचार्य डॉ.मकरंद साखळकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ.सुरेंद्र ठाकूरदेसाई, उपप्राचार्य डॉ.अपर्णा कुलकर्णी, उपप्राचार्य डॉ.चित्रा गोस्वामी, उपप्राचार्य डॉ.सीमा कदम यांनी सर्व विद्यार्थांचे अभिनंदन केले आहे.