(देवरुख / सुरेश सप्रे)
देवरूख येथील तरुण व हरहुन्नरी व्यक्तीमत्व असलेले जयंतीलाल पारसमल जैन यांचे मंगळवारी दुपारी 1वाजता हैदराबाद येथील राहत्या घरी निधन झाले. मुळचे जयंतीलाल हे देवरूख येथिल प्रसिद्ध असलेल्या शांती काँल्थ सेंटरचे भागिदार होते. 20 वर्षांपूर्वी ते आपला पारंपरिक व्यवसाय सोडून नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी देवरूखहून हैदराबाद येथे गेले. तेथे त्यांनी ज्वेलरी व अन्य व्यवसाय सुरू केला. व चांगला जम बसवला होता.
हैदराबाद येथे गेले तरी त्यांची देवरूखशी असलेली नाळ जोडलेली असल्याने ते विविध सणात व बाजारपेठेतील माघी उत्सवात मोठ्या आनंदाने भाग घेत असत. तालुक्यातील कोणीही हैदराबाद सफरीवर असेल तर त्याची ओळख असो वा नसो अशा अनेकांना ते सर्वांना ते हरप्रकारे मदतीचा हात देत असत.
जयंती हे गेले सहा महिने कर्करोगाच्या आजाराने त्रस्त होते. त्यांचेवर हैदराबाद येथे उपचार सुरु होते. प्रकृती सुधारत असताना दोन दिवसापूर्वी त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने उपचाराला साथ न दिल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.. हैदराबाद येथे त्यांच्या वर अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांचे पश्चात दोन भाऊ. पत्नी. मुले असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने देवरुख शहरावर शोककळा पसरली आहे..