(जैतापूर / वार्ताहर)
श्री महापुरुष क्रिकेट क्लब आयोजित MCC चषक नाटे 2024 जैतापूर संघाने पटकावला तर उपविजेता मैत्री पॅकर्स नाटे ठरला. मालिकावीर म्हणून जैतापूर संघाचा ओमकार खानविलकर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक संतोष करलकर, उत्कृष्ट फलंदाज नितेश आंबोळकर तर सामना वेळ म्हणून सनी करगुटकर यांना गौरविण्यात आले. स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ नाटेचे लोकनियुक्त सरपंच संदिप बांदकर अमजदभाई बोरकर, मलिक गडकरी गणेश नार्वेकर, पत्रकार राजन लाड, फैय्याज नळेकर, राजेश गावकर पिंट्या बांदकर, उमेश चव्हाण आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला
श्री महापुरुष क्रिकेट क्लब, नाटे आयोजित MCC चषक 2024 स्पर्धेचे पाचवे वर्षे होते. या स्पर्धा 19 मार्च 2024 ते 23 मार्च 2024 या पाच दिवसात नाटे ठाकरेवाडी येथे पार पडल्या. पहिल्या 4 दिवसात 4 संघांनी उपांत्य फेरी मध्ये प्रवेश मिळवला त्यामधे जय महाकाली मावळांगे, त्रिशा इलेव्हन जैतापूर, मैत्री पॅकर्स नाटे आणि जय राईसिंग स्टार गणेशगुळे या संघांचा समावेश होता.
उपांत्य फेरी मधील पहिला सामना मैत्री पॅकर्स नाटे विरुद्ध जय महाकाली मावळांगे मध्ये झाला. या सामन्यात मैत्री पॅकर्स नाटे या संघाने विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात क्रिशा 11 जैतापूर या संघाने राईसिंग स्टार गणेशगुळे या संघाचा पराभव करून अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला.. अंतिम सामना मैत्री पॅकर्स नाटे विरुद्ध त्रिशा इलेव्हन जैतापूर असा झाला. यामधे जैतापूर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करून 65 धावा केल्या आणि 66 धावांचे आव्हान मैत्री पॅकर्स नाटे या संघाला दिले. मैत्री पॅकर्स नाटे संघ 66 धावा बनवण्यात अयशस्वी ठरला आणि त्रिशा इलेव्हनजैतापूर हा संघ 24 धावांनी विजयी झाला.
स्पर्धेचे प्रथम पारितोषिक नाटेचे लोकनियुक्त सरपंच श्री संदीप बांदकर व नाटे ग्रामपंचायत सदस्य सौ. सुवर्णा गावकर यांज कडून कै. रमण शंकर बांदकर यांच्या स्मरणार्थ 20 हजार रुपये रोख तर ॲड. जमीर खलिफे यांजकडून प्रथम क्रमांक आकर्षक चषक देण्यात आला होता. हार्बर कंपनी यांजकडून द्वितीय पारितोषिक 15 हजार रुपये रोख तर अद्विक अवधूत झेंडे यांजकडून द्वितीय क्रमांक चषक देण्यात आला होता. श्री अमजद बोरकर यांजकडून तृतीय पारितोषिक रोख 5 हजार
तर हॉटेल साई नाटेचे राजेश चव्हाण आणि उमेश (बंड्या) चव्हाण यांजकडून तृतीय क्रमांक चषक देण्यात आला. समीर सुरेश भोसले आणि परिवार यांजकडून स्पर्धेसाठी लागणारे सन्मानचिन्ह. तर जिशान कलेक्शन यांजकडून You – tube लाईव्हसाठी प्रायोजकत्व देण्यात आले होते.
या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे सदस्य प्रसाद आरेकर, विवेक शेट्ये ,गणेश पारकर, मनीष मसुरकर, तेजस नागवेकर, अक्षय मयेकर, संतोष वाडेकर, प्रणय कलव, नितेश आंबोळकर, विघ्नेश पेडणेकर, सुनील डुगीलकर, प्रशांत कनेरी, सौरभ लकले, क्षितिज हळदनकर, वैभव कांबळी, रोशन डुगीलकर, सौरभ लाड, सौरभ पवार, केतन कोलेकर, आशिष बांदकर, कुशल हातीसकर, संतोष करळकर, सिद्धार्थ शेट्ये, राज हळदणकर, अनिल नार्वेकर ,ओमकार पेडणेकर, संदेश कोलेकर, प्रसाद पाखरे, दिवाकर पेडणेकर, कृष्णा पेडणेकर, अक्षय बांदकर, अक्षय थळेश्री, ओमकार पाटणकर, नितेश ठाकरे, रुपेश वाडेकर, रवी मयेकर, प्रवीण होलम, प्रेमानंद कलव, दुर्वांक गावकर, कल्पेश राड्ये, करण थळेश्री, विनायक वाघे, सुरज पाटील, पिंट्या बांदकर आदींसह मंडळाच्या सर्व सदस्यांनी मेहनत घेतली. बक्षीस वितरण समारंभाचे सूत्रसंचालन उमेश उर्फ बंड्या चव्हाण यांनी केले.
Follow us on Google News : https://news.google.com/s/CBIw9dzq7KQB?sceid=IN:en&sceid=IN:en&sceid=IN:en&r=0&oc=1