(जैतापूर / वार्ताहर)
राजापूर तालुक्यातील जैतापूर येथे एसटी स्टँड परिसरात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू आहे. या उत्सव काळात अनेक कार्यक्रमांचे आयोजन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. काल पार पडलेल्या ईद-ए-मिलाद च्या पार्श्वभूमीवर जैतापूर मुस्लिम इन कमिटीच्या वतीने मुस्लिम बांधवांच्या जुलूस चे आयोजन करण्यात आले होते. जामा मशीद पासून जैतापूर एसटी स्टँड पर्यंत आणि पुन्हा जामा मशीद असे आयोजन करण्यात आले होते.
हा जुलूस जैतापूर चा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडपा बाहेर आल्यानंतर मंडळाच्या वतीने सर्व मुस्लिम बांधवांना ईद-ए-मिलाद च्या शुभेच्छा देण्याबरोबरच सरबत वाटून सर्वांचे स्वागत करण्यात आले. सागरी पोलीस ठाणे नाटेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश केदारी आपल्या सर्व सहकाऱ्यांसह उपस्थित होते.
तर या जुलूस रॅलीमध्ये शरफुद्दीन काझी, जलाल काजी, सरफराज गुलामहुसेन काझी, जावेद काझी, मेहबूब वाघू, बाबालाल बावानी, हनीफ बावानी, नासिर काझी, युसुफ काझी, रिजवान काझी, इरफान काझी, जमीर सय्यद ,साजिद सय्यद, समीर सय्यद आदींसह बहुसंख्य मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. तर या जुलूसचे जैतापूर चा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे गिरीश करगुटकर, राजन लाड, राजेंद्र प्रसाद राऊत, राकेश दांडेकर, सुनील करगुटकर, श्रीकृष्ण राऊत, संदीप चव्हाण, प्रसाद मांजरेकर, रेशम लाड, स्मिता नाचणकर, प्रियांका नार्वेकर, रिया मांजरेकर, बंदिनी मांजरेकर, गजानन करमळकर, निलेश पालकर आदींसह मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्वागत केले.