(संगमेश्वर / एजाज पटेल)
ग्रामपंचायत परचुरी येथे गुरुवार दि. २४/१०/२०२४ रोजी जे. के. ट्रस्ट बॉम्बे आणि जे एस डब्लू फाउंडेशन यांच्या सौजन्याने समाजिक बांधिलकी अंतर्गत एक दिवसीय मोफत पशुवैद्यकीय शिबिराचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी जे एस डब्लू फाउंडेशनचे प्रोजेक्ट मैनेजर मयूर पिंपळे, कम्युनिटी ऑर्गनायझर भूषण दळवी, जेके ट्रस्ट एफपीओ कॉर्डिनेटर जयप्रकाश त्रिवेदी, आरडीओ आदित्य कदम आणि सिद्धेश आउंधकर, पशुवैद्यकीय डॉक्टर तनुश्रीया पाटिर, दिपक गांगुरडे, मनोज काजरेकर आणि चित्तरंजन बने यांनी एकत्रितपणे आमच्या गावातील ५४ शेतकरी आणि २५० जनावरांवर (गाई आणि म्हशी) उपचार केले. कृत्रिम गर्भाधान, लसीकरण, पशु व्यवस्थापन, विभागीय योजना इ. शेतकऱ्यांना तपशीलवार समजावून सांगण्यात आले. या पशुवैद्यकीय शिबिराचे आयोजक, जे. के. ट्रस्ट बॉम्बे यांचे या गावातील सर्व पशुपालकांच्या वतीने मनापासून आभार मानण्यात आले.