(जैतापूर / वार्ताहर)
केवळ लेखणीच्या जोरावर नाट्य क्षेत्राच्या माध्यमातून उत्तुंग शिखरापर्यंत पोहोचलेल्या आणि मालवणी सारखी बोलीभाषा आपल्या वस्त्रहरण या नाटकाच्या माध्यमातून थेट लंडन पर्यंत पोहोचवणाऱ्या गवाणकर साहेब यांचे वास्तव्य राजापूर तालुक्यातील माडबन या परिसरात असणे हे या परिसराचे भाग्यच आहे, असे उदगार सागरी पोलीस ठाणे नाटेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश केदारी यांनी काढले.
जवळपास एक तास त्यांनी विविध विषयांवर त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी गवाणकर यांनी केदारी यांना गांजले ते गाजले आणि विठ्ठल विठ्ठल स्वलिखित पुस्तकांची भेट दिली.
यावेळी त्यांच्या समवेत पत्रकार राजन लाड, पोलीस कर्मचारी ठोके, वाहन चालक ठीक यांसह नितेश गवाणकर आदी उपस्थित होते.
याचवेळी केदारी यांनी माडबन येथील प्रसिद्ध भगवती मंदिराला ही भेट दिली. त्यावेळी मंदिराचे पुजारी आणि नवरात्र उत्सव कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी गंगाराम गवाणकर यांच्या हस्ते केदारी यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान केला