( नवी दिल्ली )
सध्या इराण-इस्त्रायलमध्ये संघर्ष सुरू आहे. तसेच इस्त्रायल हिजबुल्लाहवर सातत्याने हवाई हल्ले करत आहे. तर दुसरीकडे गाझामध्ये हमासविद्ध युद्ध सुरू आहे. दरम्यान, रविवारी पहाटे इस्त्रायलने गाझा मशिदीवर हवाई हल्ला केला आहे. या हवाई हल्ल्यामध्ये किमान 18 जणांचा मृत्यू झाला तर 20 जण जखमी झाले. याबाबत गाझामधील पॅलेस्टाईन हॉस्पिटल माहिती देताना सांगितले आहे. अचानक झालेल्या या हल्ल्याने लोकांमध्ये खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार. मध्य गाझापट्टीत देर अल-बालाह येथील अल-अक्सा रूगण्यालच्या मशिदीजवळ हा हल्ला झाला. पॅलेस्टीनी नागरिक या ठिकाणी इस्त्रायलसोबतच्या युद्धाच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त लोक जमले होते. याच वेळी हा हल्ला करण्यात आला. गाझाच्या आरोग्यमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, इस्त्रायलने गाझावर केलेल्या आत्तापर्यंतच्या लष्करी हल्ल्यामध्ये सुमारे 42 हजार पॅलेस्टिनी नागरिक मारले गेले आहेत.
युद्धबंदीची मागणी
मीडिया रिपोर्टनुसार, 7 ऑक्टोबरच्या रात्री हमासच्या दहशतवाद्यांनी इस्त्रायलवर हल्ले केलेहोते. या हल्ल्यात 1200 लोक मारले गेल तर 250 लोकांना ओलीस ठेवण्यात आले होते. या हल्ल्यानंतर इस्त्रायल-हमास युद्ध सुरू झाले. गाझामध्ये इस्त्रायलच्या हल्ल्याला आता एक वर्ष पूर्ण होणार असून गाझामध्ये अनेक पॅलेस्टिनी मागरिक प्रमुख शहरांमध्ये एकत्र आले आहेत. गाझामधील पॅलेस्टिनी नागरिकांनी युद्धबंदीची मागणी केली आहे.
लंडनमधील पॅलेस्टिनी देखील युद्ध बंदीची मागणी करत आहेत
मिळालेल्या माहितीनुसार,लंडनमधील 40 हजार पॅलेस्टिनी समर्थकांनी देखील युद्धबंदीची मागणी केली आहे. पॅलेस्टिनी समर्थकांनी गाझामधील पॅलेस्टिनी नागरिकांवर होणारे हल्ले थांबवण्याची मागणी केली आहे. दरम्यान, पॅरिस, रोम, मनिला केपटाऊन आणि इतर अनेक शहरांमध्ये देखील मिरवणुका काढण्यात आल्या आहेत. आत्तापर्यंत अनेक वेळी गाझामधील नरसंहार थांबवण्याचे प्रयत्न करण्यात आले होते मात्र ते अयशस्वी ठरले. त्यामुळे आंदोलकांनी पुन्हा एकदा प्रयत्न करण्यास सुरूवात केली आहे. 7 ऑक्टोबर रोजी जगभरातील अनेक शहरांमध्ये पॅलेस्टिनी नागरिक मिरवणुका काढणार असल्याची घो।मा करण्यात आली आहे.