(क्रीडा)
IPL 2203 स्पर्धा ३१ मार्चपासून सुरू होत आहे. या स्पर्धेच्या १६व्या हंगामाबाबत क्रिकेट रसिकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. आयपीएल सामन्यांमध्ये कॉमेंट्रमुळेदेखील उत्साह वाढतो. आता IPL 2023 च्या हिंदी आणि इंग्रजी समालोचकांची संपूर्ण यादी समोर आली आहे.
त्याचबरोबर काही वेगळे आणि नवे कॉमेंटेटर्सही यावेळी ऐकायला मिळणार आहेत. यावेळी इरफान पठाणसोबत त्याचा मोठा भाऊ युसूफ पठाण आयपीएलमध्ये हिंदी कॉमेंट्री करताना दिसणार आहे. युसूफ त्याच्या वेगवान फलंदाजीसाठी ओळखला जात होता, परंतु समालोचन हा त्याच्यासाठी नवीन अनुभव असेल. मात्र, या यादीत दिग्गज हिंदी समालोचक आकाश चोप्राचे नाव नाही.
हिंदी समालोचक
वीरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग, इरफान पठाण, युसूफ पठाण, मिताली राज, मोहम्मद कैफ, संजय मांजरेकर, इम्रान ताहिर, दीपदास गुप्ता, अजय मेहरा, पदमजीत सेहरावत आणि जतीन सप्रू यांचा समावेश असेल.
इंग्रजी समालोचक
सुनील गावस्कर, जॅक कॅलिस, मॅथ्यू हेडन, केविन पीटरसन, अॅरॉन फिंच, टॉम मूडी, पॉल कॉलिंगवूड, डॅनियल व्हिटोरी, डॅनियल मॉरिसन आणि डेव्हिड हसी.
मराठी समालोचक
आदित्य तारे, अमोल मुजुमदार, कुणाल दाते, प्रसन्न संत, चैतन्य संत, स्नेहल प्रधान, संदीप पाटील, प्रसाद क्षीरसागर
पहिला सामना गुजरात-चेन्नई
३१ मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएलच्या १६व्या हंगामात गतविजेत्या गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात पहिला सामना होणार आहे. हा सामना अहमदाबादमध्ये होणार आहे. या स्पर्धेत एकूण ७० साखळी सामने खेळवले जाणार आहेत. स्पर्धेतील शेवटचा साखळी सामना २१ मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात बंगळुरू येथे खेळवला जाईल.