(खेड)
खेड तालुका विधी सेवा समितीतर्फे तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश-१ डॉ सुधीर देशपांडे यांचे मार्गदर्शनानुसार रोटरी इंग्लीश मिडीयम हायस्कूल खेड येथे ‘जागतिक महिला दिन’ साजरा करण्यात आला. यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ सुधीर एम. देशपांडे यांनी कोनेंलिया सोराबजी या भारतातील पहिल्या महिला वकिल तसेच पहिल्या औपचारिक महिला पदवीधर व ऑक्सफर्ड विद्यापिठात कायदा शिकणा-या पहिल्या महिला होत्या असे सांगितले. त्यांचा जन्म १५ नोव्हेंबर १८६६ मध्ये महाराष्टातील नाशिक येथे झाला असून विदेशात कायदयाचे शिक्षण घेणा-या त्या पहिल्या भारतीय महिला होत्या. पुणे येथील डेक्कन कॉलेजमधील तीनशे विद्यार्थ्यांमध्ये त्या एक महिला विद्यार्थीनी होत्या. महिलांनी कोर्नेलिया सोराबजी यांचा आदर्श बाळगून स्वतःचे करिअर निवडून यश संपादन करण्यासाठी प्रयत्न करत रहावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
सदर कार्यक्रमास जिल्हा न्यायाधीश-१ खेड डॉ सुधीर देशपांडे, तसेच रोटरी इंग्लीश मिडीयम स्कूल खेडच्या प्राचार्या सौ. भुमिता पटेल, समन्वयक श्री राहुल गाडबैल तसेच विद्यार्थीनी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी तालुका विधी सेवा समितीचे कर्मचारी श्रीमती कांचन साळवी व श्री संदिप जोशी यांनी परिश्रम घेतले.
फोटो: खेड न्यायालयातर्फे ‘जागतिक महिला दिन’ या झालेल्या कार्यक्रमात बोलताना अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश १ खेड डॉ सुधीर एम. देशपांडे तसेच प्राचार्या सौ भुमिता पटेल आदी मान्यवर
Follow us on Google News : https://news.google.com/s/CBIw9dzq7KQB?sceid=IN:en&sceid=IN:en&sceid=IN:en&r=0&oc=1