(चिपळूण)
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणानंतर परशुराम घाटातील दुर्घटनांच्या कारणांचा शोध घेण्याचे काम राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून सुरू झाले आहे. या पार्श्वभुमीवर मुख्य अभियंता संतोष शेलार यांच्यासह महामार्गाच्या वरीष्ठ पथकाने शनिवारी घाटाची पाहणी केली. घाटात कोसळलेल्या भिंतीच्या ठिकाणी बोअर मारून कातळाची तपासणी करण्यात आली.
केंद्र सरकारकडून नव्या उपाययोजना राबवण्यासाठी नियुक्त केलेल्या टेहरी हायड्रो डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. (टीएचडीसीएल) या संस्थेने गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये परशुराम घाटाची तपासणी करत उपाययोजना सुचवल्या होत्या. त्यानुसार कामेही करण्यात आली. तर आता संरक्षक भिंती कोसळत असल्याने घाटाच्या खालील बाजूची भुगर्भीय तपासणी करून त्यानुसार पुढील उपाययोजना केल्या जाणार आहेत. त्यासाठी शनिवारपासून बोअर मारून कातळाची खोली, दगडाचा दर्जा याची तपासणी सुरू करण्यात आली आहे. याबाबतचा अहवाल हा महामार्गकडून टेहरी संस्थेकडे पाठवला जाणार आहे.
शनिवारी घाटात कोसळलेल्या संरक्षक भिंताच्या खालील भागात कातळाच्या तपासणीला सुरूवात करण्यात आलेली आहे. महामार्गाचे मुख्य अभियंता संतोष देशमुख, रस्ते विकास मंत्रालयाचे विभागीय अधिकारी तथा मुख्य अभियंता फेगडे, पंकज गोसावी यांच्यासह महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी दुपारी परशुराम घाटाची पाहणी करत आवश्यक त्या सूचना कंत्राटदार कंपनी आणि स्थानिक अभियंत्याना केल्या.