(सिंधुदुर्ग)
जिल्हा शिवसेनेच्यावतीने हवामान आधारित आंबा काजू पिक विमा योजने बद्दल १ जुलै २०२४ रोजी विमा रक्कम मिळण्यासाठी मागणी करण्यात आली होती. वारंवार आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून कृषी मंत्री धनंजय मुंडे किंवा कृषी अधीक्षक असतील वारंवार यांच्याशी चर्चा करून आंदोलनाच्या नोटिसा देऊनही अद्यापही विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली नाही. त्यामुळे आज दिनांक ९ रोजी ठीक सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाविकास आघाडीच्या वतीने आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली छेडण्यात येणार असल्याची माहिती ठाकरे शिवसेनेचे कणकवली विधानसभा प्रमुख सतिश सावंत यांनी दिली.
या आंदोलनात महाविकास आघाडीचे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. या जिल्ह्यातील आंबा , काजू बागायतदार व शेतकरी यांनी उद्या प्रशासनाचा महाराष्ट्र शासनाचा निषेध करण्यासाठी आणि संबंधित आंबा, काजू विमा रक्कम तात्काळ मिळण्यासाठी आज धरणे आंदोलनात सहभागी होणार आहेत. या आंदोलनात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आज ११ वाजता ओरोस जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपस्थित रहावे, असे आवाहन महाविकास आघाडीच्या वतीने सतीश सावंत यांनी केले आहे.
📍पीक विमा रक्कम मिळण्यासाठी या गोष्टी गरजेच्या
पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी, संबंधित बँकेत किंवा कॉमन सर्विस सेंटर (CSC) येऊन अर्ज करावा लागतो.
पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी, अधिसूचित पिकासाठी पिक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनाही बंधन नाही.
भाग घेण्याच्या अंतिम दिनांक आधी किमान 7 दिवस संबंधित बँकेस विमा हप्ता न भरणे बाबत लेखी कळवणे गरजेचे आहे.
पीक नुकसान झाल्यास, 72 तासांच्या आत नुकसानीचा तपशील संबंधित बँक, स्थानिक कृषी विभाग, किंवा जिल्हा अधिकाऱ्यांना कळवावा.
पीक नुकसान झाल्यास, विमा कंपनीला तक्रार देण्यासाठी कृषी व शेतकरी कल्याण विभागामार्फत विकसित केलेल्या ॲपवर ऑनलाइन तक्रार करता येते.
पीक विमा रक्कम मिळण्यासाठी, उत्पादनावर आधारित दाव्यातील तुटवडा काढण्यासाठी, किमान उत्पादन (थ्रेसहोल्ड यील्ड) (टीवाय) हेच बेंचमार्क यील्ड मानले जाते.