(कळझोंडी / किशोर पवार)
रत्नागिरी तालुक्यातील कळझोंडी ब्राम्हणवाडी येथे नव्याने बांधण्यात आलेल्या अंगणवाडी इमारतीचा उद्घाटन समारंभ नामफलकाचे अनावरण करून उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी जि.प.माजी सदस्य बाबू म्हाप, जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रसाद उर्फ बाबू पाटील, पंचायत समिती माजी सभापती प्रकाश साळवी, पंचायत समिती माजी सभापती सौ.मेघना पाष्टे, सरपंच सौ.दिप्ती वीर, उपसरपंच प्रकाश पवार, विभाग प्रमुख योगेंद्र कल्याणकर, राजू साळवी, नामदेव चौगुले, ग्रामसेवक अमोल केदारी, उद्योजक आनंदा मुळ्ये, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संदीप पवार,गावातील अंगणवाडी सेविका, आशा सेविका व गावातील ग्रामस्थ भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते.
प्रारंभी नामदार उदय सामंत यांचे कळझोंडी ग्रामपंचायत येथे भव्य दिव्य स्वागत करण्यात आले. त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयाच्या वरील बाजूस नव्याने बांधण्यात आलेल्या भव्य सभागृहात नामदार उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली सभा संपन्न झाली. यावेळी नामदार सामंत यांनी कळझोंडी गावाच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, गावातील सर्व रस्ते व नव्याने बांधण्यात आलेले पूल रहदारीसाठी सुसज्ज करून देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. कळझोंडी गावाने असेच भरभरून प्रेम द्यावे असे त्यांनी आवाहन केले. मुख्यमंत्री -माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ लाभार्थी सर्व महिलांनी घ्यावा, यासाठी येथील सरपंच, उपसरपंच महिला विभाग प्रमुख सौ.मेघना पाष्टे यांनी या मोहिमेत सहकार्य करावे, अशा मार्गदर्शक सूचना मंत्री उदय सामंत यांनी दिल्या.
उपसरपंच प्रकाश पवार यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. गावातील झालेली विविध विकास कामे व नव्याने होणारी विकास कामे या कामांची उपस्थित सभागृहाला दिली. कळझोंडी गावासाठी एक कोटी पंचवीस लाख पेक्षा अधिक निधी मंजूर केल्यामुळे समस्त सभागृहाने समाधान व्यक्त केले