(कळझोंडी / किशोर पवार)
रत्नागिरी तालुक्यातील कळझोंडी बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र.११ पंचशिल नगर बुद्धविहार येथे आषाढी पौर्णिमेनिमित्त वर्षावास कार्यक्रमाचा शुभारंभ माजी शिक्षण विस्तार अधिकारी, आयु. अनिल पवार गुरुजी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली धम्म प्रवचन देऊन साजरा करण्यात आला.
याप्रसंगी उपाध्यक्ष – संदीप पवार,सहसचिव प्रबोध पवार, कोषाध्यक्ष – प्रविण पवार,सल्लागार – किशोर पवार, सभापती – प्रकाश पवार, मुंबई शाखेचे अध्यक्ष आयु. विजय पवार, ज्येष्ठ सदस्य महेंद्र तथा आप्पा पवार, महिला मंडाळाच्या अध्यक्षा- नलिनी पवार, उपाध्यक्षा – संपदा पवार, सचिव रिना पवार, ज्येष्ठ सदस्या शुभांगी पवार, प्रमिला पवार, माजी ऑडिटर – शितल पवार यांच्या सह शाखेतील सर्व धम्म बंधू भगिनी उपस्थित होते.
माहे जानेवारी २०२४ पासुन कळझोंडी बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने दर महिन्याच्या पौर्णिमेला त्या – त्या पौर्णिमेचे महत्व पटऊन देण्याचे काही ऐतिहासिक धम्म घटनांचा दाखला देऊन सांगितले जाते. जानेवारी महिन्यात आयु.अनिल पवार गुरुजी, फेब्रुवारी महिन्यात किशोर पवार, मार्च महिन्यात सेक्रटरी – सुभाष पवार,एप्रिल मध्ये बौध्दाचार्य – दिक्षा पवार, मे महिना वेषाख पौर्णिमा बौध्दाचार्य प्रिशा पवार, जून महिन्यात महिला मंडळ अध्यक्षा – नलिनी पवार यांनी पौर्णिमांचे महत्व पटऊन दिले. तसेच आषाडी पौर्णिमेनिमित्त वर्षावास कार्यक्रमाचा शुभारंभ कळझोंडी बौद्धजन पंचायत समितीचे उपक्रमशिल अध्यक्ष व कवी आयु. अनिल पवार गुरुजी यांच्या अभ्यास पूर्ण प्रवचनाने करण्यात आला.
यावेळी आयु. अनिल पवार यांनी वर्षावास कार्यक्रमाचे महत्व, गुरु-शिष्यांचे नाते – बुद्धकालीन विचार, चार आर्य सत्य अष्टांगिक मार्ग व एकूणच धम्म प्रबोधनात्मक ऐतिहासिक दाखले देऊन धम्म प्रवचन दिले. त्यानंतर बौद्धजन पंचायत समितीचे माशिक कामकाज करण्यात आले. वरिष्ट शाखांकडुन आलेल्या परिपत्रकांचे वाचन करण्यात आले. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने बाबत सर्व महिलांना माहिती देण्यात आली. शेवटच्या गाथेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. अतिशय शिस्तबध्द व शांततेत हा कार्यक्रम संपन्न झाला.