(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) रत्नागिरी तालुका यांचे बहुउद्देशीय जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन समारंभ साई एजन्सी स्टॉप टी.आर.पी रत्नागिरी येथे मोठ्या उत्साहाने संपन्न झाला.
सदर उद्धाटन समारंभ रत्नागिरी तालुका बौद्धजन पंचायत समितीचे अध्यक्ष आयु .प्रकाश रामचंद्र पवार यांच्या हस्ते तर राज्य कार्यकारणी सदस्य दादा मर्चंडे यांचे प्रमुख उपस्थितीत 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून मोठ्या उत्साहाने करण्यात आला. आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते आयु .तु. गो सावंत गुरुजी आणि सिद्धहस्त उद्योजक व रि.पा.इं तालुका सरचिटणीस आयु .उज्वल तथा बंटी कांबळे यांच्या संकल्पनेतून साकारलेले रि पा इं बहुउद्देशीय जनसंपर्क कार्यालयाच्या या उद्घाटन समारंभाला रि .पा.इं कोकण प्रदेश माजी सदस्य प्रदीप कुमार जाधव रि .पा.इं तालुका अध्यक्ष विलासजी कांबळे, सरचिटणीस उज्वल तथा बंटी कांबळे, तालुका उपाध्यक्ष दीपक कांबळे, शैलेश कांबळे, केतन पवार, किशोर पवार, माजी तहसीलदार विजयजी जाधव, तालुका बौद्धजन पंचायत समितीचे सचिव सुहास कांबळे, कोषाध्यक्ष मंगेश सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
भारतीय संविधान दिनानिमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय लोकशाहीला विरोधी पक्ष म्हणून त्यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाची स्थापना केली आणि सर्व बहुजन समाजाला आपल्या न्याय हक्कासाठी समर्थ पर्याय दिला. या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाची व्यापक भूमिका बहुजन समाजामध्ये निर्माण करण्यासाठी सर्वांनी एक संघ होऊन राजकीय अस्तित्व निर्माण करूया असे आवाहन ज्येष्ठ नेते दादा मर्चंडे, तु.गो. सावंत गुरुजी, विलासजी कांबळे यांनी केले आहे. प्रारंभी त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले व फीत कापून या कार्यालयाचे उद्घाटन आयु. प्रकाश रामचंद्र पवार यांनी केले .
यानंतर भगवान गौतम बुद्ध ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भारतीय संविधान यांना पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयु. सुहास कांबळे यांनी केले. तर सर्वांच्या आभार तु.गो. सावंत गुरुजी यांनी मानले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले )या पक्षाचे कार्यालय रत्नागिरी सारख्या शहरी भागात निर्माण झाल्याने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी व तमाम जनतेमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे .रत्नागिरी तालुका बौद्धजन पंचायत समितीचे अध्यक्ष प्रकाश पवार, सचिव सुहास कांबळे, कोषाध्यक्ष मंगेश सावंत, रि पा इं नेते दादा मर्चंडे, तु .गो .सावंत आदी मान्यवराने आपल्या मनोगतातून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी सर्वांना शुभेच्छा दिल्या.