(रत्नागिरी)
रत्नागिरी मतदार संघातील रत्नागिरी नगरपरिषद हद्दीतील वैशिष्ट्य पूर्ण योजने अंतर्गत रत्नागिरी नगर परिषद हद्दीतील युनिटी ट्युलीप इमारती बाहेरील सुलोचना रामचंद्र झगडे- कॉर्नर गार्डनचे उद्घाटन राज्याचे उद्योगमंत्री रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. हे नाविन्यपूर्ण गार्डन नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्र.५ मध्ये सर्व जनतेसाठी खुले करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे औचित्यसाधून पालकमंत्री उदय सामंत यांनी उपस्थित शहरवासियांना मार्गदर्शन केले ते म्हणाले देशाच्या पर्यटनात रत्नागिरी शहर भर घालणार असल्याचा तसेच पुतळे, उद्याने याच्यापुढे जाऊन रत्नागिरीचा सर्वागीण विकास करण्याचा मानस उदय सामंत यांनी यावेळी व्यक्त केला.
या कार्यक्रमाला जिल्हाप्रमुख राहुल पंडित, उपजिल्हा प्रमुख राजन शेट्ये, महिला जिल्हा प्रमुख शिल्पाताई सुर्वे, तालुका प्रमुख बाबू म्हाप, सुदेश मयेकर, मुख्य अधिकारी तुषार बाबर, शहर प्रमुख बिपीन बंदरकर, निमेश नायर, पूजा पवार, दीपक पवार, सौरभ मलुष्टे, प्रशांत सुर्वे, वसंत पाटील, बारक्या हळदणकर तसेच प्रभाग ५ मधील नागरिक उपस्थित होते.