( राजापूर / तुषार पाचलकर )
शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या पाचल येथील पक्ष कार्यालयाचे उदघाटन आज सिंधुरत्न योजनेचे सदस्य, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन चे उपाध्यक्ष तसेच शिवसेना पक्षाचे नेते किरण उर्फ भैया सामंत यांच्या हस्ते असंख्य लोकांच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटात संपन्न झाले.
यावेळी किरण उर्फ भैया सामंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत पाचल जिल्हा परिषद गटातील अनेक गावातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील त्यांचबरोबर इतर पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ, महिला यांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश केला. मिळालेल्या माहितीनुसार पाचल व परिसरातील इतर पक्षातले पदाधिकारी आणि कार्यकर्ते लवकरच पक्ष प्रवेश करणार असल्याची माहिती देण्यात आली.
या कार्यक्रमाला अपूर्वा किरण सामंत, पक्ष निरीक्षक संदेश पटेल, शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख राजू कुरूप, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अशफाक हाजू, राजापूर तालुकाप्रमुख दीपक नागले, महिला तालुकाप्रमुख शुभांगी डबरे, तालुका संघटक भरत लाड, उपतालुका प्रमुख चंद्रकांत जानस्कर, युवा सेना उपविभाग प्रमुख गणेश लाड, विभाग प्रमुख शैलेश साळवी, अमर जाधव, उपविभाग प्रमुख संतोष सरवणकर, युवा सेना तालुका प्रमुख सुनील गुरव, विभाग प्रमुख नाना कोरगावकर, ओनी शाखा प्रमुख नितीन माळी, उपविभाग प्रमुख उदय राणे, संतोष सावंत, रवी सावंत, युवा सेना विभाग प्रमुख सिद्धेश नारकर, राहुल गोसावी, युवा सेना विभाग प्रमुख गणेश लाड, जितेंद्र वेताळे, जेष्ठ कार्यकर्ते आप्पा साळवी, आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.