( रत्नागिरी )
सावित्रीबाई फुले बहुउद्देशीय सामाजिक संस्था, रत्नागिरी या संस्थेचा उद्घाटन समारंभ रविवारी (दिनांक २९/९/२०२४ ) मा. श्री. धनश्री पालांडे (संपादिका – दैनिक रत्नभुमी) उद्घाटक मा. श्री. मोहितकुमार सैनी (जिल्हा युवा अधिकारी – नेहरू युवा केंद्र रत्नागिरी, सिंधुदुर्ग) यांच्या हस्ते पार पडला. दर समारंभाचा कार्यक्रम पाली येथील मराठा मंदिर न्यू इंग्लिश हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथे करण्यात आला.
या सावित्रीबाई फुले बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे रत्नागिरी अध्यक्ष चंद्रमणी सावंत, उपाध्यक्ष तेजस्विनी कांबळे,सचिव अमर पवार, खजिनदार विनया गमरे आणि सदस्य साहिल पवार,गौरी सावंत,नितेश कांबळे, कोमल पवार अशा तरुण तरुणी एकत्रित येऊन संस्थेचा पाय रचला आहे. संस्थेच्या नावामध्ये बहुउद्देशीय सामाजिक संस्था असे असल्याने सामाजिक स्तरावरील विविध विषय हाताळले जाणार आहेत. या उद्घाटन कार्यक्रमाला प्राचार्या डॉ. कांता कांबळे, प्राचार्य सुदेश कांबळे, रघुनाथ कांबळे, कुंडलिक कांबळे, बबन कांबळे, प्रसेनजित देवधेकर आणि इतर मान्यवरांनी उपस्थिती दर्शवून मोलाचे असे मार्गदर्शन केले. या उद्घाटन प्रसंगी रत्नागिरी जिल्ह्यातील विविध क्षेत्रात कार्यरत असणारी मंडळी आणि मोठ्या संख्येने तरुण, तरुणी उपस्थित होते.