(वास्तू)
वास्तुशास्त्रात कासव खूप भाग्यवान मानले जाते आणि कासव घरात ठेवणेही लाभदायक असते. कासवाला विजयाचे प्रतिक मानले जाते. कासव घरी ठेवल्याचे बरेच लाभ मिळतात. वास्तविक, कासव विष्णूशी संबंधित असल्याचे पाहिले जाते आणि म्हणूनच घरात अथवा बोटात कासवाची अंगठी ठेवणे शुभ मानले जाते. बरेच लोक त्यांच्या घरात तांब्याचे, काचेचे कींवा इतर कोणत्याही धातूचे कासव ठेवतात. पौराणिक कथांनुसार, कासव भगवान विष्णूंचा अवतार मानला जातो. कासव धैर्य, शांती, निरंतरता आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते.
समुद्र मंथनच्या कथे अनुसार भगवान विष्णू ने समुद्र मंथनासाठी कासवाचा अवतार घेतला होता. आणि लक्ष्मी माता समुद्र मंथनातून प्रकट झाली होती. जी भगवान विष्णूची पत्नी झाली. यासाठी लक्ष्मी सोबत कासवाला सुध्दा धन वाढवणारे मानले जाते. अंगठी परिधान करतांना कासवाच्या डोक्याचा भाग परिधान करणाऱ्याच्या दिशेने असावा. यामुळे लक्ष्मीचे आगमन कायम राहते. तसेच ही अंगठी मधल्या वा पहिल्या बोटात परिधान करावी. असाही सल्ला दिला जातो. आजकाल अनेकांच्या हातात तुम्ही कासवाची अंगठी पाहिली असेल. काही लोक फॅशनसाठी घालतात तर काही वास्तुशास्त्रानुसार घालतात. मात्र ही अंगठी घालण्यामागचे काही शास्त्र आहे.
कासव अंगठी
आपण बर्याच लोकांना कासव रिंग घातलेले देखील पाहिले असेल. जर आपल्याला असे वाटले की एक फॅशन म्हणून त्याने कासवाची अंगठी घातली आहे. तर तसे नाही, कासवाची अंगठी घातल्याने नशीब उघडते असे म्हटले जाते. या अंगठीचे आकार कासवसारखे असून बर्याच धातूंमध्ये ते उपलब्ध असते. कासवाची अंगठी घालण्याचे फायदे खालीलप्रमाणे आहेत.
Also Read : कोकणवासीयांना रेल्वेचा मोठा दिलासा; उन्हाळी सुट्टीनिमित्त २४ विशेष गाड्या
कासवाचा आकार असलेली अंगठी वापरण्याचे फायदे व उपयोग
- आपण कासवाची अंगठी घालून श्रीमंतीकडे वाटचाल सुरु होते असा आशावाद निर्माण होतो. ही अंगठी परिधान केल्याने लक्ष्मी देवी प्रसन्न होते आणि आपल्याला धनिक बनवते. ज्यांना आर्थिक संकट किंवा त्याबाबतीत संकटाचा सामना करावा लागत आहे, त्यांनी ही अंगठी घालणे आवश्यक असते.
- जर कुंडलीत कोणत्याही प्रकारचा दोष आढळला तर आयुष्यात बर्याच समस्या उद्भवतात आणि माणूस नेहमीच त्रस्त असतो. तथापि, कासव अंगठी घालून, नंतर जन्मकुंडलीतील सर्व दोष काही प्रमाणात नष्ट होतात आणि दोष कालांतराने दूर होतात.
- ज्या लोकांचे नशीब त्यांना समर्थन देत नाही त्यांनी जर कासव अंगठी घातली असेल तर त्यांचे बंद नशीब उघडते असे मानले जाते.
- घरात मतभेद असल्यास घराच्या प्रत्येक सदस्याने ही अंगठी घालायला हवी. ही अंगठी परिधान केल्याने घरातला कलह संपून घरातील सदस्यांच्या मनात एकमेकांबद्दलचे प्रेम वाढत जाते.
- ज्यांना भगवान विष्णूचा आशीर्वाद घ्यायचा आहे त्यांनी हि अंगठी परिधान केलेच पाहिजे. तुम्ही परिधान केल्यावर भगवान विष्णूची कृपा राहते.
- व्यवसाय योग्य प्रकारे चालू नसेल तेव्हा हि अंगठी घातल्याने व्यवसाय व्यवस्थित चालू होईल. व्यवसायातील अडचणी दूर होतील. त्याचप्रमाणे नोकरीमध्ये काही अडचण येत असेल तर ही अंगठी परिधान केल्याने आपल्याला इच्छित नोकरी मिळते.
- अस्वस्थ मनाचे लोक देखील ही अंगठी घालू शकतात. ते परिधान केल्याने मनाची आणि डोक्याची शांती होते.
- कासव असा एक जीव आहे जो 100 वर्षांपलीकडे जगतो. म्हणून कासव रिंग परिधान केल्याने आयुष्य वाढते.
- जे लोक नेहमी आजारी असतात, जर त्यांनी कासवाची अंगठी घातली तर त्यांचा आजार बरा होतो. ही अंगठी ढाल म्हणून कार्य करते.
- कासवाची अंगठी घालण्यामुळे वाईट स्वप्न पडायचे बंद होतात.
- ही अंगठी परिधान केल्याने शांतता, संयम आणि जीवनात सातत्य येते.
- कासवाची अंगठी वास्तुशास्त्रात शुभ मानली जाते. व्यक्तीच्या जीवनातील अनेक दोष दूर करण्याचे काम या अंगठीमुळे होते. यामुळे आत्मविश्वास वाढतो.
- कासव पाण्यात राहतं म्हणून ते सकारात्मक ऊर्जा आणि प्रगतीचं लक्षण मानलं जातं. पौराणिक कथेनुसार कासव समुद्र मंथनातून उत्पन्न झाले आहे तसेच लक्ष्मीसुद्धा तिथूनच निर्माण झाल्याने कासव समुद्धीचं प्रतीक मानलं जातं.
- शास्त्रानुसार कासावाला लक्ष्मीदेवीप्रमाणे धनप्राप्ती, धैय आणि शांतीचे प्रतीक मानले जाते.
- वास्तुशास्त्रानुसार कासवाची अंगठी चांदीत बनवावी. दुसऱया धातूची अंगठी बनवणार असाल तर कासवाचा आकार चांदीचा बनवून त्यावर सोन्याचा मुलामा किंवा दुसरे कोणतेही रत्न लावू शकतात.
- बोटात अंगठी घालताना कासवाचं डोकं व्यक्तीच्या दिशेने असावा.
- ही अंगठी तर्जनी किंवा मध्यमा बोटामध्ये घालावी.
- अंगठी उजव्या हाताच्या मधल्या बोतामध्ये किंवा तर्जनी मध्ये घातली पाहिजे. कासव हे लक्ष्मी माते सोबत जोडलेले आहे यासाठी शक्यतो शुक्रवारी ही अंगठी घालण्यास सुरुवात करावी.
- कासवाचा आकार असा बनवा की कासवाचे तोंड अंगठी घालणाऱ्याकडे असावे. कासवाचे तोंड बाहेरील बाजूला असल्यास नकारात्मक प्रभाव पडू शकतो.
- शुक्रवारी अंगठी खरेदी करावी आणि घरी आणून थोड्यावेळ लक्ष्मीमाते समोर ठेवावी. दुध आणि पाण्याने धुवावे. यानंतर धारण करावी.
- कासवाला शांती, धैर्य, सातत्य आणि सुख-समृद्धीचे प्रतीक मानले जाते. कासववाली अंगठी चांदीची असेल तर जास्त शुभ असते.
- शास्त्रानुसार कासव सकारात्मक आणि प्रगतीचे प्रतीक आहे.
मान्यता आहे की, कासवाची अंगठी घातल्याने आयुष्यात शांती, सौभाग्य आणि जीवनात समृद्धी येते. परंतु अशा काही राशी आहेत ज्यांनी कासवाची अंगठी घालू नये अन्यथा त्यांना त्याचा त्रास होऊ शकतो. म्हणून अशी अंगठी घालण्यापूर्वी एकदा ज्योतिष विषयक तज्ञांचा अवश्य सल्ला घ्या.
या चार राशींनी ही अंगठी घालू नये
कासव अंगठी घालणे शुभ असते, परंतु मेष, वृश्चिक, मीन आणि कन्या या चार राशीच्या लोकांनी ज्योतिषीय सल्ल्याशिवाय कधीही ही अंगठी घालू नये. ती परिधान केल्याने करिअर कठीण होऊ शकते आणि व्यवसायाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. यामुळे कुटुंबात आर्थिक वाद निर्माण होत असून कुटुंबात भांडणे आणि क्लेश होण्याची परिस्थिती असते. कुटुंबाच्या आनंद, शांती आणि समृद्धीवर परिणाम होतो. या राशीचे लोक अंगठी घालण्याऐवजी त्यांच्या घरात कासव ठेवू शकतात. याचा त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर सकारात्मक परिणाम होईल.
(टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती सामाजिक मान्यता व उपलब्ध माहितीवर आधारित आहे.)
Follow us on Google News : https://news.google.com/s/CBIw9dzq7KQB?sceid=IN:en&sceid=IN:en&sceid=IN:en&r=0&oc=1