(राजापूर / वार्ताहर)
आगामी विधानसभा 2024 निवडणुकीच्या अनुषंगाने राजापूर तालुक्यातील रायपाटण पोलीस दूरक्षेत्राच्या हद्दीतील जवळपास अठ्ठावीस गावच्या पोलीस पाटील यांची सभा रविवारी रायपाटण पोलीस दूरक्षेत्र येथे आयोजित करण्यात आली होती. या सभेला राजापूर तालुका पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण स्वतः उपस्थित राहून उपस्थित सर्व गावच्या पोलीस पाटीलांना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना देऊन सर्वांकडून सहकार्या अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी राजापूर तालुका पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण सह रायापाटण पोलीस दूरक्षेत्र चे ठाणे अंमलदार कमलाकर तळेकर, पो. कॉ.भीम कोळी, पो.कॉ.स्वप्नील घाडगे, पो.कॉ.रामदास पाटील. व अठ्ठावीस गावचे पोलीस पाटील उपस्थित होते.