( गणपतीपुळे / वैभव पवार )
रत्नागिरी तालुक्यातील आगरनरळ केंद्राच्या हिवाळी क्रीडा स्पर्धा दिनांक १७ व १८ डिसेंबर २०२४ रोजी देऊड लावगण नं०२ येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये आगरनरळ कुणबी वाडी नं ०२ ने वैयक्तिक व सांघिक यश संपादन केले आहे. यामध्ये मोठा गट मुली कबड्डी व लंगडी या स्पर्धेमध्ये विजेता झाले, तर खोखो या स्पर्धेमध्ये उपविजेता ठरला आहे.
वैयक्तिक क्रीडा प्रकारामध्ये १०० मी धावणे कु. सानवी विष्णू गोताड प्रथम क्रमांक, कु चांदणी चंद्रकांत गोताड द्वितीय क्रमांक, लांब उडी- सानवी विष्णू गोताड प्रथम क्रमांक पटकविला आहे.
आगरनरळ कुणबी वाडी नं ०२ च्या विद्यार्थ्यांनी केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धामध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. या सर्व विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक साळवी सर, गावडेसर, विचारेसर व दडस बाई यांनी मार्गदर्शन केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती, पालक यांजकडून अभिनंदन केले आहे.