( रत्नागिरी )
७३ वी अखिल भारतीय पोलीस क्रीडा स्पर्धेमध्ये रत्नागिरी पोलीस दलातील महिला पोलीस कॉंस्टेबल शीतल पिंजरे यांनी कांस्य पदक प्राप्त केले.
दिनांक ०९ नोव्हेंबर २०२४ ते दि. १४ नोव्हेंबर २०२४ या कालावधी मध्ये ७३ वी अखिल भारतीय पोलीस क्रीडा स्पर्धा नवी दिल्ली येथे पार पडली. या स्पर्धेमध्ये संपूर्ण भारतातून एकूण ४० विविध पोलीस दलातील संघांनी भाग घेतला होता. या मध्ये महाराष्ट्र पोलीस दलाचा देखील सहभाग होता.
७३ वी अखिल भारतीय पोलीस क्रीडा स्पर्धे मधील उंच उडी या स्पर्धा प्रकारामध्ये रत्नागिरी पोलीस दलाच्या महिला पोलीस कॉंस्टेबल श्रीमती शीतल संभाजी पिंजरे यांनी महाराष्ट्र पोलीस दलातर्फे स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. पोलीस कॉंस्टेबल श्रीमती शीतल संभाजी पिंजरे यांनी “उंच उडी“ या स्पर्धे प्रकारामध्ये “1.63 मिटर“ उंच उडी मारून आपले नाव “कांस्य” पदकावर कोरून महाराष्ट्र पोलीस दलाची तसेच रत्नागिरी पोलीस दलाची प्रतिमा उंचावली आहे.
७३ वी अखिल भारतीय पोलीस क्रीडा स्पर्धा मधील पोलीस कॉंस्टेबल श्रीमती पिंजरे यांच्या या उत्कृष्ट कामगिरी बद्दल पोलीस अधीक्षक, रत्नागिरी धनंजय कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी अभिनंदन केले आहे. तसेच त्यांना तसेच १०,०००/- बक्षीस देखील जाहीर केले आहे.