(जाकादेवी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील खालगाव जाकादेवी तरवळ परिसरात गुरुवारी (३१ रोजी ) सायंकाळी आलेल्या जोरदार वादळी पावसाने शेतकऱ्यांच्या घरांचे व गोठ्यांवरील पत्रे उडण्याचे प्रकार घडले असून काही भागात वीजेचे पोल कोलमडून पडल्याच्या घटना ऐन दिवाळीच्या सणांमध्ये घडल्याने या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी वर्ग भयभीत झाला आहे.
गुरुवार दि ३१ रोजी सायंकाळी वादळी पावसाने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले असल्याचे ग्रामस्थांमधून सांगण्यात आले आहे.
सायंकाळच्या दरम्याने खालगाव धामणेवाडी, खालगाव मधली गोताडवाडी, शेवटची गोतडवाडी तसेच तरवळ मायंगडेवाडी परिसरामध्ये अनेक ठिकाणी घरांवरील तसेच गोठ्यांवरील कौले व पत्रे उडण्याचे प्रकार घडले तर काही वस्तीत वीजेचे पोल कोलमडून पडल्याने परिसरात वीज प्रवाह खंडित झाला आहे .याबाबत सविस्तर पंचनामा शुक्रवारी १ नोव्हेंबर रोजी खालगाव तलाठी कार्यालय व ग्रामपंचायतीकडून केले जात आहे.