(दापोली)
शाळा स्तरावर किंवा विद्यार्थ्यांच्या बाबतीत कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्याला पूर्णपणे संबंधित शाळा- संस्था मुख्याध्यापक यांची जबाबदारी राहील, असे दापोली तालुका गटशिक्षणाधिकारी अण्णासाहेब बळवंतराव यांनी दापोली अर्बन काॅलेज येथे झालेल्या स्कूल सेफ्टी व स्टुडंट सेफ्टी या विषयावरील दापोली तालुक्यातील सर्व शाळांचे प्राचार्य, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्ताराधिकारी यांच्या कार्यशाळेत त्वरीत कारवाईचे दिले संकेत.
बदलापूरच्या घटनेने पूर्ण महाराष्ट्रात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर होत असल्याने, दापोलीत अशी कोणतीही घटना घडू नये याकरिता दापोली येथे जि.प.तसेच सर्व माध्यमाच्या माध्यमिक,शाळांचे मुख्याध्यापक व पर्यवेक्षिय यंत्रना यांची एक दिवसीय मार्गदर्शन पर कार्यशाळा,श्रीम.राऊत व श्रीम.गुजर पोलीस अधिकारी दापोली यांच्या उपस्थितीमध्ये घेण्यात आली. यावेळी सर्व बाबी अत्यंत बारकाईने सर्व शाळांमध्ये पोहोचतील आणि विद्यार्थी सुरक्षा बाबत कडक उपाययोजना केल्या जातील या दृष्टीने सर्वांना सूचना देण्यात आल्या. व शंकांचे निरसन करण्यात आले
1)बाल हक्क संरक्षण कायद्यानुसार सर्वच बालकाच्या हिताचे हक्काचे रक्षण करणे.
2)शाळास्तरीय सखी -सावित्री समिती कर्तव्य आणि जबाबदारी.
3)शाळा व परिसरात सि.सि.टी.व्ही कॅमेरे बसवणे.विद्यार्थी,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या सुरक्षिततेसाठी असे कॅमेरे असणे हा उत्तम पर्याय आहे.
4)कर्मचारी नियुक्ती घ्यावयाची काळजी.
5)तक्रार पेटी:
शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत करावयाच्या ठोस उपाययोजनांचा भाग म्हणून राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये तक्रार पेटी बसविणे. तक्रार पेटी उघडण्याबाबत तसेच त्यात प्राप्त झालेल्या तक्रारीवर करावयाच्या कार्यवाहीसंदर्भात सदर परिपत्रकान्वये सविस्तर सूचना देण्यात आल्या आहेत. तथापि या तक्रार पेटींचा वापर सर्व शाळा प्रभावीपणे करीत आहेत किंवा कसे, याची तपासणी होणेदेखील तितकेच आवश्यक आहे.
परिपत्रकातील तरतुदींचे पालन करणे अनिवार्य आहे. यासाठी शाळेच्या मुख्याध्यापकास व्यक्तिशः जबाबदार धरण्यात येईल. यात कसूर झाल्याचे आढळून आल्यास मुख्याध्यापकावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. असे वरील सर्व शासन निर्णयावरती सखोल चर्चा व मार्गदर्शन करण्यात आल्यानंतर बळवंतराव यांनी उपस्थितांना सांगितले.
यावेळी व्यासपिठावर बळवंतराव यांचे सह विस्तार अधिकारी, पद्मन लहांगे,रामचंद्र सांगडे, बळिराम राठोड, माध्यमिक मुख्या. संघाचे तालुका अध्यक्ष संतोष हजारे, व पोलीस अधि. उपस्थित होते.