(रत्नागिरी)
क्षुल्लक कारणावरून झालेल्या मारहाणीत एका महिलेने दुसऱ्या महिलेचे नाक चावल्याचा प्रकार शनिवारी दुपारी रत्नागिरी शहराजवळील शिरगाव येथे घडला. या मारहाणप्रकरणी सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या मारहाणप्रकरणी महिलेने रत्नागिरी शहर पोलिस स्थानकात फिर्याद दिली आहे. या महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, शिरीर एजाज नाखवा, एजाज नाखवा, इम्रान नाखवा, खैरून नाखवा, आतिफा इम्रान नाखवा, आफ्रिन एजाज नाखवा, अस्सलाम एजाज नाखवा (सर्व रा. शिरगाव- नाखवा मोहल्ला, रत्नागिरी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सात जणांनी फिर्यादी महिलेच्या घरासमोर येऊन त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर इम्रान नाखवा व अस्सलाम नाखवा यांनी महिलेला लाकडी काठीने मारहाण केली.
तसेच शिरीन एजाज नाखवा या महिलेने फिर्यादी महिलेच्या नाकाला चावा घेतला. त्यामुळे महिलेच्या नाकाला दुखापत झाली आहे. तसेच सात जणांनी महिलेला मारण्याची धमकीही दिली. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस स्थानकात फिर्याद देण्यात आली आहे. अधिक तपास शहर पोलिस करीत आहेत.