(संगमेश्वर / प्रतिनिधी)
तालुक्यातील कसबा (ता. संगमेश्वर) येथे एका महिलेच्या घरी भाडयाने राहणाऱ्या खोलीत दारू पिऊन येत पत्नीबरोबर भांडण सुरू होते. यावेळी घर मालक महिलेने उद्या तुझी दारु उतरली की तु खाली ये असे सांगितल्यानंतर भाडयाने राहणाऱ्या अदनान नुरमोहमद हकिम (रा. नायरी ता. संगमेश्व जिल्हा – रत्नागिरी) याला राग आला. तो गॅलरीमध्ये येऊन तु कोण मला घर खाली करायला लावणार, असे बोलून फिर्यादीसह आईला शिवीगाळ करून खिडकीची काच फोडून नुकसान केले. हा सर्व प्रकार 27 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडला. भाडेकरु अदनान नुरमोहमद हकिम याच्या विरोधात संगमेश्वर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेबाबत रुक्सार अन्वर पाटणकर (वय-28 वर्षे, व्यवसाय – नोकरी, कसबा न्यु इंग्लीश स्कुल समोर ता. संगमेश्वर जि. रत्नागिरी.) यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीनुसार, अदनान नुरमोहमद हकिम (रा. नायरी ता. संगमेश्व जिल्हा -रत्नागिरी) हा सुमारे 03 वर्षापासुन त्याचे पत्नी व मुलासह माझे आईचे घरी कसबा येथे भाड्याने राहतो, तो दारुचा व्यसनी असुन नेहमी दारु पिवुन घरी येवुन त्याची पत्नी व मुलांना शिवीगाळ करुन मारहाण करीत असतो. दिनांक 27/02/2025 रोजी रात्री 10.00 वा. चे दरम्यान फिर्यादी व त्यांची मुलगी व आई असे जेवण करुन बोलत बसले होते. यावेळी घरी भाड्याने राहणारा अदनान नुरमोहमद हकिम हा नेहमीप्रमाणे दारु पिऊन घरी येवुन त्याचे पत्नी सोबत भांडण करु लागला.
दरम्यान फिर्यादीने अकरा वाजण्याच्या सुमारास त्याला सांगितले की, उद्या तुझी दारु उतरली की तु खाली ये, यावर तो मला म्हणाला की, मी खाली येणार नाही. मला तुझ्याशी बोलायचे आहे, तु उद्या आमचे घर खाली कर असे फिर्यादी महिलेने त्याला सांगितले असता त्याचा राग अदनान याला येवुन तो खाली घराच्या समोर असलेल्या गॅलरीमध्ये येवुन फिर्यादी महिलेला म्हणाला की, तु कोण मला घर खाली करायला लावणार, असे बोलून आईसह फिर्यादीला शिवीगाळ करून हात खिडकीवर मारुन खिडकीची काच फोडुन, तुझ्या घरी कोण कोण येते ते मला माहीत आहे असे बोलून तुम्हाला बघुन घेतो अशी धमकी दिली.
या घटनेत फिर्यादी महिला व तिच्या आईच्या मनास लज्जा उत्पन्न होईल अशी शिवीगाळ केली व घराच्या खिडकीची काच फोडुन नुकसान केले आहे. याबाबत रुक्सार अन्वर पाटणकर यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार संगमेश्वर पोलिस ठाण्यात अदनान नुरमोहमद हकिम याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता (बी एन एस ) २०२३ ॲक्टनुसार कलम ७९, ३५२, ३५१(२), ३२४ (४) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परस्पर विरोधी गुन्हे दाखल
या प्रकरणात अदनान नुरमोहंमद हकीम (४३, मूळ रा. उजगाव, करवीर, कोल्हापूर, सध्या रा. कसबा, संगमेश्वर) यांनी देखील फिर्याद दिली आहे. ते कसबा येथील एका महिलेच्या घरी भाड्याने राहतात. अदनान हकीम हे कसबा येथील घरी आले असता दोन महिलांनी त्यांच्या घरी जाऊन ताबडतोब घर खाली करण्यास सांगितले. त्यावर हकीम यांनी ‘मला दुसरे घर मिळाल्याशिवाय मी घर खाली करू शकत नाही,’ असे सांगितले. हकीम हे भाड्याच्या राहत्या घरात गेले असता या दोन महिलांनी त्यांना पुन्हा बोलावून घेत उद्या घर खाली करण्यास सांगितले. यावेळी युसुफ कापडी (३२) याने हकीम यांना धरून ठेवले. त्याचवेळी रौउफ बोट (३६, रा. कळंबस्ते, संगमेश्वर) याने चाकू घेऊन झटापट केली. झटापटीत हकीम यांच्या हाताला चाकूने दुखापत झाली. या प्रकरणात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.