(रत्नागिरी)
अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीच्या वतीने कोकण रेल्वेवरील प्रवाशांकडून त्यांच्या मागण्या घेऊन एक सर्वसमावेशक निवेदन कोकण रेल्वे, मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वेला समितीकडून पाठवल्याचे सेक्रेटरी यशवंत जडयार यांनी सांगितले. त्यामध्ये कोकण रेल्वेचे खाजगीकरण न करता त्याचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करून दुहेरीकरण करण करावे किंवा त्यांचे स्वातंत्र्य झोन बनवावे किंवा महाराष्ट्रातील भाग मध्य रेल्वेमध्ये विलिनीकरण करावा, सावंतवाडी स्टेशनला सुसज्ज टर्मिनस बनवून त्याला कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा.मधू दंडवते यांचे नाव देण्यात यावे, पश्चिम रेल्वेवरुन कोकण रेल्वेमार्गावर नेहमीसाठी वसई सावंतवाडी पॅसेंजर किंवा मधू दंडवते एक्सप्रेस व मध्य रेल्वेवरून कल्याण सावंतवाडी पॅसेंजर तसेच दादर-चिपळूण मेमू व मुंबई-रत्नागिरी इंटरसिटी एक्सप्रेस तर रत्नागिरी ते मडगाव दरम्याने दिवसाला मेमू रेल्वे सुरू करावी, या वाढीव रेल्वेमुळे कोकणी माणूस कोकण रेल्वेतून जो शेळ्या मेढ्यांसारखा प्रवास करत आहे, त्याला याचा फायदा होईल असे श्री. यशवंत जडयार यांनी सांगितले.
तसेच १०१०५ / १०१०६ सावंतवाडी दिवा एक्सप्रेस व ५०१०४ / ५०१०३ रत्नागिरी दिवा फास्ट पॅसेंजर दादर किंवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकातून सुरू करून सकाळी ६.३० ते ७ च्या दरम्यान पुर्वीची १०१०१ / १०१०२ रत्नागिरी मडगाव एक्सप्रेस सुरू करावी,कोकण रेल्वेचे बेलापूर येथील भाडयाच्या जागेत असलेले मुख्यालय कोकण रेल्वेच्या हद्दीत रत्नागिरी येथे स्वतःच्या जागेत स्थलांतरित करावे याच्याने भाडयासाठी लागणारा निधी कोकण रेल्वेच्या इतर कामासाठी वापरला जाईल असे श्री.सुभाष लाड यांनी सांगितले.
पश्चिम रेल्वेवरून कोकण रेल्वे मार्गावर जाण्यासाठी नायगाव ते ज्यूचंद्र दरम्याने बायपास फाटकाचे काम लवकर करावे असे श्री.विलास पावस्कर यांनी सांगितले,तसेच कोकणातील प्रत्येक रेल्वे स्टेशनचा आरक्षण कोटा वाढवावा, दिघी-रोहा-चिचवड, गुहागर-चिपळूण-कराड व विजयदुर्ग-वैभववाडी-कोल्हापूर रेल्वे मार्ग लवकरात लवकर पूर्ण करावेत हे मार्ग जोडल्यास कोकण पश्चिम महाराष्ट्राशी जोडले जाईल असे श्री.बाळासाहेब सावंत यांनी सांगितले.
भूमिपुत्रांना नोकरीत प्राधान्य देऊन स्टेशनवरील सर्व स्टॉल व कॅटरिंग त्यांनाच मिळावेत, कोकण रेल्वेच्या प्रत्येक स्टेशनवर पूर्ण उंचीचा फलाट, संपूर्ण शेड, लाईट, रेल्वे ब्रीज, स्पीकर, पिण्याचे पाणी व चांगले शौचालय याची व्यवस्था करावी, रेल्वेने पुर्वीच्या ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या सर्व सवलती व सेवासुविधा पूर्ववत कराव्यात. व कोकण रेल्वेची सांकेतिक भाषा मराठी करावी, मध्य रेल्वेवरून कोकण रेल्वेमार्गावर जाणाऱ्या सर्व एक्सप्रेसना ( Up & Down ) दिवा जक्शन येथे थांबे मिळावेत. दिवा स्टेशन येथे कोकणातील चाकरमन्यांची वस्ती मोठया प्रमाणात असल्याने तेथे थांबा मिळणे महत्वाचे आहे असे बाळ वेळकर यांनी सांगितले.
तसेच ११००३ / ११००४ तुतारी एक्सप्रेस, १२१३३ / १२१३४ मुंबई मंगळुरु सुपरफास्ट एक्सप्रेस, १२६१९ / १२६२० मत्स्यगंधा एक्सप्रेस २४ आयसीएफ/२२ एलएचबी डब्यांनी तर १२०५१ / १२०५२ जनशताब्दी एक्सप्रेस, २२११९ / २२१२० तेजस एक्सप्रेस, १०१०५ / १०१०६ सिंधुदुर्ग एक्सप्रेस, ५०१०४ / ५०१०३ रत्नागिरी फास्ट पॅसेंजर २२ एलएचबी डब्यांनी चालवाव्यात.
१०१०५ /०६ दिवा सावंतवाडी एक्सप्रेसला पेण,नागोठणे व पुढे रोहा ते रत्नागिरी दरम्याने सर्व ठिकाणी कोरोनापूर्वी असणारे थांबे पुर्ववत करावेत.अंजनी रेल्वे स्टेशन येथे ओव्हर ब्रीज किंवा भूयारी मार्ग बनवावा अंजनी स्टेशन येथे एका बाजूला गाव तर रेल्वे ट्रकच्या पलिकडे शेती असल्याने येथे ब्रीज महत्वाचा असल्याचे श्री.अनिल मोरे यांनी सांगितले.
वीर,संगमेश्वर रोड,आडवली ,विलवडे,राजापूर रोड वैभववाडी रोड,सिंधुदुर्ग,सावंतवाडी रोड,आणि पेडणे येथे पूर्णवेळ PRS सुविधा सुरू करणे बाबत,कोरोना काळात ZBTT अंतर्गत काढलेले थांबे पूर्ववत करणे,कोकण रेल्वे मार्गावर अमृत भारत स्थानक योजना आणि One Station one product योजना लागू करणे,सागरमाला अंतर्गत सावंतवाडी ते रेडी बंदर रेल्वे मार्ग मंजूर, तसेच २०१८ साली सावंतवाडी ते बेळगाव रेल्वे मार्गाचा फिसिबीलिटी रिपोर्ट तयार त्याला चालना देणे असे श्री.मनोहर गावडे यांनी सुचवले.
कोकणातील पर्यटनासाठी टॉय ट्रेन
१) सिंधुदुर्ग जिल्हा : कणकवली ते सावंतवाडी व्हाया देवगड, मालवण व वेंगुर्ला. २) रत्नागिरी जिल्हा : राजापूर जैतापूर,पावस, जयगड, गुहागर, दापोली ते खेड. ३) रायगड जिल्हा: पेण, अलिबाग, मुरुड, दिघी, श्रीवर्धन, हरिहरेश्वर, महाड, रायगड, पुणे कर्जत करून पनवेलला जाणाऱ्या सर्व रेल्वे कल्याण पनवेल मार्गे कोकण रेल्वे मार्गावर चालवाव्यात. सर्व सुपरफास्ट एक्सप्रेस मिरज मार्गे वळवाव्यात किंवा त्यांना रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हात जास्तीचे थांबे दयावेत.
रत्नागिरी येथील पिट लाईन जुनी झाल्यामुळे नव्याने बांधण्यासाठी तात्पुरती बंद करण्यात आली होती ती पुन्हा सुरू करावी व रत्नागिरी येथून मुंबई सावंतवाडी मडगाव कारवारच्या दिशेने वाढीव गाडया सुरू कराव्यात. माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, विलवडे, राजापूर रोड,वैभववाडी रोड, कणकवली,कुडाळ व सावंतवाडी रोड येथे रेल्वेला जादाचे थांबे मिळावेत. असे सामितीच्या वतीने कोकण रेल्वे मार्गावरील अनेक रेल्वे स्टेशनवरील प्रवाशांच्या मागण्या या निवेदनाच्या वतीने कोकण रेल्वेकडे सविस्तरपणे मांडण्यात आल्याचे अध्यक्ष श्री. शेखर बागवे यांनी सांगितले.