(रत्नागिरी)
येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने रत्नागिरी येथे १३३ वा जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाला पालकमंत्री ना. उदयजी सामंत यांनी प्रमुख हजेरी लावली होती. यावेळी पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी समस्त जनतेला डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पालकमंत्री उदय सामंत यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी या कार्यक्रमाला संबोधीत करताना पालकमंत्री म्हणाले, काही लोक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाबद्दल अपप्रचार करत संविधान बदलणार असल्याची अफवा पसरवत आहेत. मात्र संविधान बदलण्याचे कोणी धाडस जरी केले तर तुमचा उदय सामंत राजकीय सन्यास घेऊन तुमच्या सोबत असणार असा शब्द जयंती कार्यक्रमा निमित्ताने उपस्थित जनतेला दिला. आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे राज्याच्या उद्योगमंत्री, आणि रत्नागिरीच्या पालकमंत्री पदावर पोहचलो असल्याचे सांगायला मला कधी कमीपणा वाटला नाही आणि वाटणार ही नाही, असे पालकमंत्री उदय सामंत म्हणाले.
जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील आंबडवे येथे गेल्या वर्षी पासून शासकीय जयंती साजरी करण्यास सुरवात केली असून कायम स्वरूपी ही शासकीय जयंती सुरु राहणार असल्याचा शब्द पालकमंत्री उदय सामंत यांनी दिला.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यासाठी १८ एप्रिलला प्रमोद महाजन क्रीडागणावर मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून आपण सर्वांनी यां कार्यक्रमाला हजारोच्या संख्येत उपस्थित राहण्याचे आहवान मंत्री उदय सामंत यांनी केले आहे. यावेळी शिवसेना जिल्हाध्यक्ष राहुल पंडित, तालुका प्रमुख बाबू म्हाप, ज्येष्ट नगरसेवक राजन शेट्ये, एल. बी. पवार, संतोष कदम, कुमार शेट्ये, हारीस शेकासन, रफिक बिजापुरी, दीपक जाधव, बी. के. कांबळे, सिद्धी नार्वेकर यांच्या सहित असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.